फोटो सौजन्य - Social Media
‘बिग बॉस मराठी ६’ ची हवा संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. यंदाच्या सीझन मध्ये सगळ्या क्षेत्रातील कलाकारांना आमंत्रित केले गेले आहे. अशामध्ये सहाव्या पर्वाचा पहिला आठवडा इथे पार पडला आहे. यंदाच्या आठवड्यात सगळ्यांनी कमालीचे प्रदर्शन तर दिलेच असून प्रत्येकाविषयी प्रत्येकाचे मत वेगळे आहे. बिग बॉस म्हंटल तर राडा तर होणारच! आणि या आठवड्यामध्ये राडा करणारी स्पर्धक ठरली आहे तन्वी कोलते!
तन्वीने घरात एंट्री घेतल्या घेतल्या वादळच आणलं आहे. आधी करण सोनावणे याने तहान लागली आणि घरात जाण्याचे दरवाजे बंद होते म्हणून स्विमिंग पूलचे पाणी प्यायले. त्यामध्ये तन्वी आणि रुचिरा जामदारचे भांडण झाले. त्यांनतर तन्वीने सागरच्या प्रोफेशनविषयी काढलेले शब्दांमुळे संपूर्ण सोशल मीडियावर तिची चर्चा होती. अनेक कलाकारांनी तिच्या त्या शब्दांवरून तिला झापलेसुद्धा आहे. अशात या आठवड्यात भांडणांमध्ये राधानेही कोणतीही कमतरता ठेवली नाही. सुरुवातीच्या दिवसात दीपाली सय्यदने ‘आताची लावणी म्हणजे स्टेजवर बार डान्सर्स उचलून आणणे.” अशी कमेंट केली होती, त्यामुळे नृत्यांगना असणारी राधा पाटीलला हे शब्द चांगलेच झोंबले होते. यावरून त्या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली होती. नुकतेच, कालच्या एपिसोडमध्ये, राधाने प्रभू शेळकेवर जवळजवळ हातच उचलला होता.
विशाल कोटियन आणि ओमकार राऊतही एकमेकांना भिडले होते. या आठवड्यात प्रभू शेळके, रुचिता जामदार, राधा पाटील, सागर कारंडे, दीपाली सय्यद, अनुश्री माने, दिव्या शिंदे, कारण सोनावणे आणि रोशन भजनकर हे सदस्य घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. प्रेक्षकांनी केलेल्या वोटींगच्या आधारे, रुचिरा आणि प्रभूला फार कमी ओट मिळाले आहेत. प्रभूच्या दिशेने प्रेक्षकांचा कौल फारच कमी दिसत आहे. तरीही यंदाच्या या नॉमिनेशनमध्ये कुणीही घराबाहेर पडणार नाही अशी मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या या निर्णयाने प्रेक्षकांमध्ये नाराजीही दिसून येत आहे. आज यंदाच्या पर्वाचा पहिला भाऊचा धक्का असल्याने, आज यंदाचे होस्ट रितेश भाऊ काय सुनावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.






