Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिनेसृष्टीतून निवृत्त होणार नाना पाटेकर? घेतला मोठा निर्णय, म्हणाले ‘मला माझ्या पद्धतीने जगायचंय…’

नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्ती सोहळा नुकताच उत्साहात पार पडला आहे. या कार्यक्रमा दरम्यान अभिनेते नानांनी त्यांच्या आयुष्यातील मोठी घोषणा केली. ते लवकरच सिनेसृष्टीतून निवृत्त होणार असल्याचे समजले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 15, 2025 | 04:12 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सिनेसृष्टीतून निवृत्त होणार नाना पाटेकर?
  • नाना पाटेकर यांनी घेतला मोठा निर्णय
  • नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्ती सोहळा संपन्न
अभिनेते नाना पाटेकर नुकतेच हाऊसफुल ५ या बॉलीवूड चित्रपटामध्ये दिसले होते. या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. गेली अनेक दशकं मराठी चित्रपटांसह अनेक हिंदी चित्रपटामध्येही काम केलं आहे. अभिनयाची छाप वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर कोरली आहे. नाना पाटेकर अनेक सामाजिक कार्यांमध्ये सक्रीय असतात. त्यातीलच एक म्हणजे नाम फाऊंडेशन. नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यात बोलताना नानांनी त्यांच्या आयुष्यातील मोठी घोषणा केली आहे. नानांना अभिनयातून निवृत्ती घ्यायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यत्त केली आहे.

Bigg Boss 19: कुनिका नंतर आता अमाल मलिकचे प्रणीतसोबत जोरदार भांडण, कॅप्टन अमालचं का फिरलं डोकं?

रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे नाम फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नानांनी उपस्थितांशी अनौपचारिक संवाद साधला आहे. यावेळी बोलताना नानांनी निवृत्ती घेण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. नाना म्हणाले, “आजवर मी खूप काम केलं आता मला मनासारखं जगावं असं वाटतंय.1 जानेवारीला मी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीन. त्यानंतर नाटक, सिनेमातून निवृत्त होऊन गावखेड्यांतील विवंचना समजून घ्याव्यात आणि त्यांच्यासाठी काही करावं, असं मला वाटत आहे.”

नाना पुढे म्हणाले, “पंचाहत्तरीनंतर नाटक, सिनेमातून निवृत्त व्हावं असे वाटते आहे. ज्यातून तुम्हाला खूप काही सांगता येईल अशी एखादी छान कलाकृती वाट्याला आली तर ती मी नक्कीच करेन पण आता मला माझ्या पद्धतीने जगू द्या”. असे नाना पाटेकर म्हणाले आहेत.

“मिराई सिनेमा बघितल्यावर मी स्वतःच्या थोबाडीत मारली!” असं का म्हणाले राम गोपाल वर्मा?

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मिळून ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली. या नाम फाउंडेशनला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बोलताना नाना म्हणाले, “ही धुराही आता मकरंदनेच पुढे न्यावी. कान धरायला आणि पाठीवर थाप द्यायला मी सोबत असेनच. नामची पुढची पिढी उत्तम पद्धतीने आमचे काम पुढे नेत आहे. कामाची व्याप्ती खूप वाढली आहे. आता नामचं पुढील काम मकरंद ठरवेल. मी असेन तरच काम करीन ही त्याची भूमिका चुकीची आहे. नामसारख्या शंभर संस्था निर्माण झाल्या, तरी समस्या सुटणार नाही.”

 

 

 

Web Title: Nana patekar retirement from acting said now let me live my life my way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.