(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
मिराई हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे. 12 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावरही या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून या चर्चांमध्ये आता दिग्दर्शक राम गोपाल यांनी देखील एक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून मिराई या चित्रपटाचे भरभरून कौतुक केलं आहे. त्यांनी यात खास करूम चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्स, कलाकरांचा अभिनय, आणि दिग्दर्शन यांची देखील स्तुती केली आहे.
After seeing #Mirai , I don’t remember the last time VFX felt so grand , even in the so called + 400 cr films
Hey @HeroManoj1 I thought you were miscast as the villain , and I slapped myself after seeing your terrific portrayal 🔥🔥🔥
Hey @tejasajja123 I thought you might…
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) September 14, 2025
काय म्हणाले राम गोपाल वर्मा?
”खूप दिवसांनंतर इतकं भव्य VFX पाहायला मिळालं, जे काही वेळा 400 कोटींच्या बजेटच्या चित्रपटांमध्ये दिसत नाही. सुरुवातीला त्यांना वाटत होतं की अभिनेता मनोज मंजुनाथ खलनायकाच्या भूमिकेसाठी योग्य नाहीत. चित्रपटातील व्हिलनची भूमिका बघितल्यावर मी स्वतःच्या थोबाडीत मारली. यावर ते असंही म्हणाले की चित्रपट बघितल्यानंतर माझा काही शंका देखील दूर झाल्या.”
चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या कार्तिक गट्टा यांच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं, त्यांनी लिहिलं की ” हा चित्रपट म्हणजे एक सुंदर स्वप्न आहे. या पौराणिकचा आणि खऱ्या गोष्टींचं सुंदर मिश्रण आहे. ”
“उद्या करेन असं म्हणून आईचा शेवटचा कॉलही उचलला नाही”, आईच्या आठवणीत किकू शारदा भावूक
‘मिराई’ चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती
‘मिराई’ हा चित्रपट ‘वेधा’ नावाच्या एका तरुणाची कथा सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटात वेधा नावाची भूमिका अभिनता तेजा सज्जा यांनी साकारली आहे. चित्रपट कथा अॅक्शन, आणि थोडासा भावनांनी भरलेला आहे. कार्तिक गट्टमनेनी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रदर्शनाच्या फक्त दोन दिवसांतच ‘मिराई’ ने जगभरात ₹५५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरतोय असं स्पष्टपणे दिसतं.