Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Movie : गोंधळी बांधवांचा चित्रपटाला पारंपरिक अभिषेक, ‘गोंधळ’ चित्रपटाच्या टीमसाठी अनोखा सन्मान

चित्रपटगृहाबाहेर पारंपरिक गोंधळी मंडळींनी खास विधीपूर्वक अभिषेक करून गोंधळ या चित्रपटाचा शुभारंभ केला

  • By अमृता यादव
Updated On: Nov 14, 2025 | 06:03 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रभर नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोंधळ’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. या चित्रपटाबाबत लक्षणीय बाब म्हणजे ‘गोंधळ’ हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतल्या अत्यंत पारंपरिक, धार्मिक आणि कलात्मक घटक असलेल्या ‘गोंधळ’ या परंपरेवर आधारित आहे. या परंपरेचा सन्मान राखत, चित्रपटगृहाबाहेर पारंपरिक गोंधळी मंडळींनी खास विधीपूर्वक अभिषेक करून चित्रपटाचा शुभारंभ केला. गोंधळातील पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि देवांच्या नावाचा जयघोष करत या मंडळींनी ‘गोंधळ’ चित्रपटाचा आनंद घेतला. ‘गोंधळ’ या परंपरेला, कलेला वाखाणणारा हा चित्रपट असून यानिमित्ताने आम्हाला महत्व मिळाल्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आमची प्राथमिक जबाबदारी म्हणून आम्ही हा अभिषेक केल्याच्या भावना गोंधळी मंडळींनी व्यक्त केल्या.

‘गोंधळ’या चित्रपटात महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली लोककला, श्रद्धा, आणि संस्कृती यांचा समृद्ध आविष्कार आहे. या चित्रपटाने कलात्मकतेसोबतच तांत्रिक बाबींमध्येही जणू नवा मापदंड निर्माण केला आहे. कॅमेऱ्याचे अप्रतिम दृष्यबंध, उत्कृष्ट छायाचित्रण, परिपूर्ण संपादन आणि जागतिक दर्जाच्या ध्वनीमिश्रणामुळे ‘गोंधळ’हा चित्रपट पाहाताना एक दृश्य-सांस्कृतिक मेजवानी ठरत आहेदिग्दर्शक संतोष दवखर यांनी आपल्या दिग्दर्शनातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेला आधुनिक रुप देत ती जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

Indian Idol: शिबानी दांडेकरने केली डोंबिवलीच्या अंशिकाची स्तुती म्हणाली, ”तूच बँड लीडर..”

चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, “प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम अवर्णनीय आहे. गोंधळी बांधवांनी आमच्या चित्रपटाच्या पोस्टरला केलेला पारंपरिक अभिषेक ही आमच्यासाठी खरी आशीर्वादाची गोष्ट आहे. आम्ही ‘गोंधळ’ हा चित्रपट पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने केला आणि आज प्रेक्षकांच्या प्रतिसादातून ते प्रेम परत मिळत आहे, यापेक्षा मोठा आनंद नाही. प्रेक्षकांना ‘गोंधळ’ आवडत आहे, हेच आमच्यासाठी सर्वात मोठं यश आहे.’’

Colors Marathi Serial: नियतीचा खेळ सुरू; ‘आई तुळजाभवानी’ मध्ये जगदंबा आणि महादेव यांची अद्भुत भेट

‘गोंधळ’ची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले आहेत.

Web Title: Outside the cinema halls traditional gondhali groups performed a special ceremonial ritual to inaugurate the movie gondhal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 06:03 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Colors Marathi Serial: तेजा – हर्षितचा लग्नसोहळा ठरणार खास,‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये कन्यादानाच्या परंपरेवर नवा प्रश्नचिन्ह
1

Colors Marathi Serial: तेजा – हर्षितचा लग्नसोहळा ठरणार खास,‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये कन्यादानाच्या परंपरेवर नवा प्रश्नचिन्ह

स्वतःचे आकाश शोधायला निघालेल्या ‘कैरी’ची गोष्ट, रोमँटिक; थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2

स्वतःचे आकाश शोधायला निघालेल्या ‘कैरी’ची गोष्ट, रोमँटिक; थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Indian Idol: शिबानी दांडेकरने केली डोंबिवलीच्या अंशिकाची स्तुती म्हणाली, ”तूच बँड लीडर..”
3

Indian Idol: शिबानी दांडेकरने केली डोंबिवलीच्या अंशिकाची स्तुती म्हणाली, ”तूच बँड लीडर..”

धैर्य, चिकाटी आणि प्रेरणेची कहाणी,‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी
4

धैर्य, चिकाटी आणि प्रेरणेची कहाणी,‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.