(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप (UMG)ची भारतातील शाखा युनिव्हर्सल म्युझिक इंडिया (UMI)ने आज भारतातील आघाडीच्या चित्रपट आणि डिजिटल कंटेंट निर्मिती कंपनी एक्सेल एंटरटेनमेंटसोबत करार झाल्याची घोषणा केली. या करारानुसार एक्सेल एंटरटेनमेंटचे मूल्यांकन २,४०० कोटी रुपयां इतके करण्यात आले असून, UMIला कंपनीत ३० टक्के हिस्सेदारी मिळणार आहे. या भागीदारीमुळे UMI आणि एक्सेल यांच्यात नवीन धोरणात्मक संबंध तयार होतील.
युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप (UMG)ची भारतातील शाखा युनिव्हर्सल म्युझिक इंडिया (UMI) आणि भारतातील आघाडीची चित्रपट व डिजिटल कंटेंट निर्मिती कंपनी एक्सेल एंटरटेनमेंट यांनी आज धोरणात्मक भागीदारीचा करार केला. या करारानुसार एक्सेल एंटरटेनमेंटचे मूल्यांकन २,४०० कोटी रुपये करण्यात आले असून, UMIला कंपनीत ३० टक्के हिस्सेदारी मिळणार आहे.
एक्सेल एंटरटेनमेंटची ओळख नेहमीच विविध आणि वैश्विक स्तरावरील कथा सादर करणाऱ्या प्रोजेक्ट्समुळे आहे. चित्रपट, डिजिटल सीरीज तसेच म्युझिकल ड्रामा प्रकारातील अनुभवामुळे एक्सेल भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी लोकप्रिय आहे.
या करारानुसार भविष्यात एक्सेलच्या प्रकल्पांसाठी तयार होणाऱ्या सर्व ओरिजिनल साउंडट्रॅक्सचे जागतिक वितरण UMGकडे असेल. याशिवाय, एक्सेलचे स्वतंत्र म्युझिक लेबल सुरू होणार असून, त्याचे जागतिक वितरण UMGकडून केले जाईल. तसेच युनिव्हर्सल म्युझिक पब्लिशिंग ग्रुप हा एक्सेलचा एकमेव म्युझिक पब्लिशिंग भागीदार ठरणार आहे.
UMI आणि UMGचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही एक्सेलच्या संचालक मंडळावर समावेश होणार आहे, तर रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर कंपनीच्या क्रिएटिव्ह दिशा आणि कंटेंटवर नेतृत्व करत राहतील.
एक्सेलचे संस्थापक रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर म्हणाले,“भारतीय मनोरंजन उद्योग सातत्याने वाढत आहे आणि जागतिक स्तरावरील अर्थपूर्ण भागीदारी उभारण्यासाठी हा योग्य काळ आहे. UMGसोबत हातमिळवणी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ही भागीदारी अत्यंत सर्जनशील आणि परिवर्तनकारी ठरेल.”
UMGचे AMEA विभागाचे सीईओ अॅडम ग्रॅनाइट म्हणाले,“भारत हा आमच्यासाठी वेगाने वाढणारा आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा संगीत बाजार आहे. एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये गुंतवणूक आणि भागीदारी केल्यामुळे, UMGला एक्सेलच्या प्रकल्पांमध्ये सुरुवातीपासूनच योगदान देण्याची संधी मिळेल.”
एक्सेलने १९९९ मध्ये स्थापना केली असून आजपर्यंत त्यांनी ४० पेक्षा अधिक चित्रपट व ओरिजिनल डिजिटल सीरीज तयार केल्या आहेत, ज्यात दिल चाहता है, लक्ष्य, तलाश, डॉन, जिंदगी ना मिलेगी दोबारा, फुकरे, दिल धडकने दो, आणि गली बॉय यांचा समावेश आहे. डिजिटल क्षेत्रात त्यांनी इनसाइड एज, मिर्झापूर, मेड इन हेवन, दहाड, आणि डब्बा कार्टेल यांसारख्या सीरीज सादर केल्या आहेत.या व्यवहारासाठी AZB & पार्टनर्स, एर्न्स्ट अँड यंग, KPMG, मॉर्गन स्टॅन्ले, आणि खेतान अँड कंपनी यांनी सल्लागार भूमिका बजावली.






