
श्रावणीच्या दुखापतीमुळे विश्वंभर राजशिर्के अत्यंत संतापले आहेत. हाताला दुखापत झालेली असताना श्रावणीला उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणे शक्य नाही आणि यामुळे त्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. आणि या रागाच्या भरात ते श्रावणीलाच याचा दोष देऊ लागतात. श्रावणीच्या अडचणीत भर पडलेली असतानाच, नेहमीप्रमाणे शुभंकर तिच्या मदतीला धावून येणार आहे. शुभंकर अत्यंत हुशारीने उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क साधत विश्वंभर राजशिर्केंची समजूत घालण्यास विनंती करतो. तो पटवून देतो की श्रावणीच्या हाताला दुखापत असली तरी ती कार्यक्रमात सहभागी होऊ शकते आणि तिच्यावर कोणताही ताण येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. आता शुभंकरचा हा प्रयत्न यशस्वी होऊन विश्वंभर राजेशिर्के यांचे मन वळवण्यात तो यशस्वी होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
एकीकडे शुभंकरचे प्रयत्न आणि दुसरीकडे श्रावणीला रोखण्यासाठी अलकनंदाची नवी खेळी, अशा दुहेरी पेचात श्रावणी अडकली आहे. श्रावणी या संकटावर मात करून ‘लाडकी लेक’ योजनेचा शुभारंभ करणार का? वडील आणि मुलीच्या नात्याचा हा गोडवा प्रेक्षकांना अनुभवता येणार का? हे शुभ श्रावणी या मालिकेच्या येत्या भागातून प्रेक्षकांना कळणार आहे.