Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावित्रीबाई-जोतीरावांच्या आयुष्यातील नवा अध्याय; अभिषेक देशमुख आणि राजसी भावे झळकणार प्रमुख भूमिकेत

स्टार प्रवाहच्या 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत नवा अध्याय उलगडणार असल्याचं समोर आले आहे. तसेच लोकप्रिय अभिनेत्री राजसी भावे सावित्रीबाई फुले तर अभिनेता अभिषेक देशमुख जोतीराव फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 06, 2026 | 11:10 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सावित्रीबाई-जोतीरावांच्या आयुष्यातील नवा अध्याय
  • सावित्रीबाई-जोतीरावांच्या तारुण्याची सुरुवात
  • नव्या कलाकारांची मालिकेत एन्ट्री
 

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चिमुकली सावित्री आणि जोतीराव यांच्या बालपणापासून सुरू झालेला प्रवास, त्यांचा विवाहसोहळा, फुलेवाड्यातील प्रसंग आणि सावित्रीबाईंनी सासरच्यांशी जुळवून घेण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. जोतीरावांनी शिक्षणासाठी केलेली धडपड आणि समाजातील अडथळ्यांवर मात करण्याची त्यांची जिद्दही प्रेक्षकांना भावली आहे.

आता ही मालिका एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून प्रेक्षकांना सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या तारुण्यावस्थेतील नवा अध्याय पाहायला मिळणार आहे. समाजातील रूढी-परंपरांना सामोरे जात सावित्रीबाईंनी शिक्षण घ्यावं आणि स्वावलंबी व्हावं यासाठी जोतीरावांनी केलेले प्रयत्न या नव्या पर्वात उलगडणार आहेत. सावित्रीबाईंना शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी जोतीरावांनी दाखवलेली दूरदृष्टी आणि समाजाच्या चौकटी मोडण्याचं धैर्य ही कथा अधिक प्रेरणादायी बनवणार आहे.

ब्रँड, बाजा, वरात! मराठी कलाविश्वातील ‘या’ दोन लोकप्रिय अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; लग्नाअधीच्या विधींनाही सुरूवात…

या नव्या टप्प्यात सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक देशमुख जोतीराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर अभिनेत्री राजसी भावे सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या प्रभावी अभिनयातून समाजपरिवर्तनाची ही प्रेरणादायी कथा अधिक ताकदीने प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना राजसी भावे म्हणाल्या की, “माझ्या आयुष्यातली ही पहिली मालिका आणि तीही स्टार प्रवाहसोबत, तसेच सावित्रीबाईंसारखं महान व्यक्तिमत्त्व साकारण्याची संधी मिळणं माझ्यासाठी अत्यंत खास आहे. बालपणातील सावित्रीबाई साकारणाऱ्या तक्षा शेट्टीने ही भूमिका अतिशय सुंदररीत्या उभी केली आहे. त्यामुळे तिच्याकडून अनेक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ही भूमिका माझ्या मनाच्या खूप जवळची आहे.”

तर अभिषेक देशमुख म्हणाले, “इतकं महान व्यक्तिमत्त्व साकारण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मी या मालिकेचा पहिल्या भागापासून चाहता आहे. मालिकेची कथा इतकी अभ्यासपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे की जोतीरावांच्या भूमिकेसाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज भासली नाही. ‘आई कुठे काय करते’ नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह परिवाराचा भाग होण्याची संधी मिळणं माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे.”

BO Collection: The Kerala Story 2 ची जबरदस्त कमाई;पहिल्याच आठवड्यात 80% बजेट वसूल

सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांची ही कथा केवळ एका जोडप्याची गोष्ट नसून समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी सुरुवात आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेतील नवा अध्याय स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Savitri jyotirao phule serial new phase abhishek deshmukh rajsi bhave star pravah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Marathi News
  • marathi serial news
  • star pravah

संबंधित बातम्या

ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका
1

ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका

LPG टंचाईच्या काळात सिलेंडरबाबत सरकारचे ‘हे’ 7 नियम जाणून घ्या, कधीही कापलं नाही जाणार तुमचं कनेक्शन
2

LPG टंचाईच्या काळात सिलेंडरबाबत सरकारचे ‘हे’ 7 नियम जाणून घ्या, कधीही कापलं नाही जाणार तुमचं कनेक्शन

नवीन कार घ्यायची गरज नाही, ‘या’ सोप्या टिप्स फॉलो केलात तर जुनी कार पण देईल चांगलं मायलेज
3

नवीन कार घ्यायची गरज नाही, ‘या’ सोप्या टिप्स फॉलो केलात तर जुनी कार पण देईल चांगलं मायलेज

Crypto बाजारात भूकंप! 8 महिन्यांत किंमत झाली अर्धी; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण, आता काय होणार?
4

Crypto बाजारात भूकंप! 8 महिन्यांत किंमत झाली अर्धी; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण, आता काय होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.