Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न, रसिकांनी घेतला ५६ चित्रपटांचा आस्वाद

२२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या कार्यक्रमात ५६ चित्रपटांचा अनुभव प्रेक्षकांना घेता आला आहे. तसेच या सोहळ्याला मोठंमोठ्या लोकांचीही उपस्थिती लाभली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 16, 2026 | 12:34 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव संपन्न
  • रसिकांनी घेतला ५६ चित्रपटांचा आस्वाद
  • जाणून घ्या कोणाला मिळाले पुरस्कार
गेला आठवडाभर रंगलेल्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. यंदाच्या आशियाई चित्रपट महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. सुमारे ५६ चित्रपटांचा आस्वाद रसिकांना यात घेता आला. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जगातल्या उत्तम चित्रपटांचा आस्वाद अशा महोत्सवांमधून घेता येत असतो.

चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी महोत्सवांप्रमाणे वेगवेगळ्या स्तरावर मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज प्रशांत साजणीकर यांनी यावेळी बोलून दाखविली. शहराप्रमाणे ग्रामीण भागात चित्रपट पोहचणे गरजेचं आहे असे त्यांनी सांगितले. शासन वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळानेच जुन्या चित्रपटांसाठी विशेष उपक्रम सुरू केला आहे. त्याचप्रमाणे नवोदित कलाकरांना व्यासपीठ उपलब्ध करून देत तीन वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. २२ वर्ष नेटाने महोत्सव करणे हे कौतुकास्पद असल्याचे सांगत ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’ च्या आयोजकांचे आभार मानत प्रशांत साजणीकर यांनी शासन चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी लक्ष देण्यास सांगितले.

Ek Din चित्रपटाच्या पोस्टरवरून सुरु झाला वाद! जुनैद खान आणि साई पल्लवीच्या पहिला लूक पाहून नेटकरी संतापले; म्हणाले…

उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करताना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी महोत्सवासाठी सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आभार मानले आणि मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. अनेकांच्या प्रयत्नांनी, सहकार्याने हा महोत्सव यशस्वी झाला असून महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी महोत्सवाचे कार्यकारिणी सदस्य श्रीकांत बोजेवार, फेस्टिवल दिग्दर्शक संतोष पाठारे, संदीप मांजरेकर यांसह दिग्दर्शक संदीप सावंत, प्रबल खौंद, विकास पाटील सुप्रतिम भोल आदि ज्युरी मेंबर सुद्धा यावेळी उपस्थित होती.

कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीचा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक आणि क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांना प्रदान करण्यात आला. “कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मला मिळालेल्या अवॉर्डबद्दल मी खरंच कृतज्ञ असून माझ्या लेखन कारकिर्दीसाठी सुधीर नांदगावकर यांचं खूप मोलाचं योगदान राहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा हा पुरस्कार घेताना मला खूप आनंद होतो आहे.’ अशा भावना मिनाक्षी शेड्डे यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.

यंदाच्या चित्रपट स्पर्धा विभागात नव्या दमाच्या दिग्दर्शकांच्या नव्या पद्धतीची मांडणी करणारे चित्रपट रसिकांना पहायला मिळाले. फेस्टिव्हल मध्ये दाखविण्यात आलेल्या चित्रपट स्पर्धेचा निकाल ही यावेळी जाहीर करण्यात आला. इंडियन सिनेमा विभागात ‘बॅलड टू द विंड्स’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘रोमँटिक अफेयर्स’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक मोंजुल बरुआ यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेता मनोज शुक्ला (बॉडी), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कासवी सोनकोरिसन (रोमँटिक अफेयर्स) ठरले.

घटस्फोटाच्या २ वर्षानंतर धनुष करणार दुसरे लग्न? वयाने नऊ वर्ष लहान असलेल्या अभिनेत्रीला करतोय डेट?

दिग्दर्शक रुद्रजित रॉय (पिंजर- द केज), अभिनेता बोलोराम दास (रोमँटिक अफेयर्स), दिग्दर्शकीय पदार्पण डॉ.ओंकार भाटकर (द वेट ऑफ लाँगिंग), अभिनेत्री (गौमाया गुरुंग- शेप ऑफ मोमो) यांना विशेष ज्युरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त यावर्षीपासून सुरु करण्यात आलेला उत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण हा पुरस्कार त्रिबेणी राय (शेप ऑफ मोमो) यांनी पटकावला आहे.

समकालीन मराठी चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान ‘साबर बोंड’ या चित्रपटाने मिळवला, तर याच चित्रपटासाठी रोहन कानवडे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. यासोबत गोंधळ चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले. भूषण मनोज, सुरज सुमन यांना ‘साबर बोंड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराच्या मानकरी रेणुका शहाणे (उत्तर) भक्ती घोघरे, (गिरण) ठरल्या. विशेष ज्युरी पुरस्काराचा सन्मान दिग्दर्शक रावबा गजमल (सांगला), कथेसाठी मनोज नाईक-साटम (गमन), बालकलाकार देवदत्त घोणे (सोहळा) यांनी मिळवला.

Web Title: The closing ceremony of the 22nd third eye asian film festival has concluded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

घटस्फोटाच्या २ वर्षानंतर धनुष करणार दुसरे लग्न? वयाने नऊ वर्ष लहान असलेल्या अभिनेत्रीला करतोय डेट?
1

घटस्फोटाच्या २ वर्षानंतर धनुष करणार दुसरे लग्न? वयाने नऊ वर्ष लहान असलेल्या अभिनेत्रीला करतोय डेट?

Ek Din चित्रपटाच्या पोस्टरवरून सुरु झाला वाद! जुनैद खान आणि साई पल्लवीच्या पहिला लूक पाहून नेटकरी संतापले; म्हणाले…
2

Ek Din चित्रपटाच्या पोस्टरवरून सुरु झाला वाद! जुनैद खान आणि साई पल्लवीच्या पहिला लूक पाहून नेटकरी संतापले; म्हणाले…

Bigg Boss Marathi 6 : तन्वीने ओलांडल्या सर्व मर्यादा, सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून हिणवलं; घरातील सदस्यांचा चढला पारा
3

Bigg Boss Marathi 6 : तन्वीने ओलांडल्या सर्व मर्यादा, सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून हिणवलं; घरातील सदस्यांचा चढला पारा

‘सूर्यकुमार खूप मेसेज करायचा’ ‘या’ वक्तव्यावरुन खुशी मुखर्जीविरुद्ध तक्रार दाखल; 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा
4

‘सूर्यकुमार खूप मेसेज करायचा’ ‘या’ वक्तव्यावरुन खुशी मुखर्जीविरुद्ध तक्रार दाखल; 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.