(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दक्षिण भारतीय अभिनेता धनुष त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसाद १४ फेब्रुवारी २०२६ रोजी व्हॅलेंटाईन डे रोजी अभिनेता दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. ज्या महिलेसोबत तो लग्नाची सात वचने घेणार ती अभिनेत्री दुसरी तिसरी नसून प्रसिद्ध हिंदी आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री मृणाल ठाकूर आहे. असे म्हटले जात आहे की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. परंतु, त्यांच्यापैकी कोणीही अद्याप त्यांच्या प्रेमसंबंध किंवा लग्नाबद्दल मौन सोडलेले नाही.
धनुष आणि मृणाल ठाकूर बऱ्याच काळापासून डेट करत आहेत. आता, हे जोडपे त्यांचे नाते पुढील स्तरावर नेण्याची योजना आखत आहे. फ्री प्रेस जर्नलमधील वृत्तानुसार, धनुष आणि मृणालच्या कथित लग्नाला फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित राहणार असल्याचे समजले आहे. व्हॅलेंटाईन डे (१४ फेब्रुवारी) रोजी हे दोघे आयुष्यभरासाठी जोडीदार होणार आहेत.
धनुष आणि मृणालचे प्रेमसंबंध कधी समजले?
ऑगस्ट २०२५ मध्ये, धनुष मृणालच्या “सन ऑफ सरदार २” या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दिसला. त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरू लागल्या. त्यानंतर, धनुषच्या “तेरे इश्क” चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीत मृणालच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. धनुषच्या दोन्ही बहिणी, डॉ. कार्तिका कार्तिक आणि विमला गीत, देखील मृणालला इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहेत. याचा अर्थ कुटुंबाला या नात्याची पूर्ण जाणीव आहे.
दोघेही त्यांचे नाते सार्वजनिक करू इच्छित नाहीत
न्यूज १८, शो मधील एका वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, “हो, ते एकमेकांना डेट करत आहेत हे खरे आहे. पण त्यांचे नाते नवीन आहे, म्हणून त्यांनी सार्वजनिक घोषणा करण्याची योजना आखलेली नाही. त्यांना बाहेर फिरायला जाण्यास किंवा एकत्र दिसण्यास हरकत नाही. त्यांचे मित्र त्यांना पाठिंबा देत आहेत कारण त्यांचे विचार आणि आवडी समान आहेत.”
गेल्या वर्षी, जेव्हा मृणालला धनुषसोबतच्या तिच्या नात्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की ते फक्त चांगले मित्र आहेत. धनुष ४२ वर्षांचा आहे आणि मृणाल ३३ वर्षांची आहे. त्यांच्या वयात नऊ वर्षांचे अंतर आहे. परंतु आता हे दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याचे समजले आहे.
२० वर्षांचे वैवाहिक जीवन तुटले
धनुषच्या मागील लग्नाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने २००४ मध्ये चेन्नई येथे एका भव्य समारंभात रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. २००६ मध्ये यात्राचा जन्म झाला तर आणि लिंगा २०१० मध्ये जन्म घेतला. २०२२ मध्ये, या जोडप्याने वेगळे होण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. २०२४ मध्ये चेन्नई कुटुंब न्यायालयात त्यांनी घटस्फोट घेतला आणि विभक्त झाले.






