Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतापासून सिंगापूरपर्यंत संगीताचा प्रवास: ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ प्रयोगातून उलगडली ‘स्वराज्य-एक दृष्टिकोन’ संकल्पना

‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ ही सांगितिक प्रस्तुती आता पहिल्यांदाच भारताबाहेर जाऊन सिंगापूरमध्ये सादर होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 03, 2026 | 07:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ ही सांगितिक प्रस्तुती आता पहिल्यांदाच भारताबाहेर सिंगापूरमध्ये सादर केली जात आहे.ही प्रस्तुती फक्त कलाकृती नाही, तर ‘स्वराज्य-एक दृष्टिकोन’ या विचाराला जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि राष्ट्रासाठी सामूहिक जबाबदारी या संदेशावर भर दिला आहे.

हिंदू नववर्षाच्या निमित्ताने ‘चैत्र पालवी २०२६’ या कार्यक्रमांतर्गत ‘पूर्णवाद परिवार, सिंगापूर’ तर्फे ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ ही भव्य ऐतिहासिक संगीतमय प्रस्तुती सादर केली जाणार आहे. मुंबईतील ‘सईशा प्रॉडक्शन्स’ निर्मित आणि सादर केलेला हा कार्यक्रम ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत सिंगापूरमधील ‘CSC@Tessensohn’ येथे होणार आहे.

हा कार्यक्रम संगीत, काव्य, निवेदन आणि दृश्यात्मक कथाकथन यांचा सुंदर संगम करून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन उलगडतो. स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाचे प्रसंग, जसे प्रतापगडाची लढाई, लाल महालावरील धाडसी सर्जिकल स्ट्राईक, सुरत मोहीम, तसेच परिचित-अपरिचित योद्ध्यांची माहिती नवगीतांद्वारे आणि निवेदनाद्वारे मांडली जाते.

या प्रस्तुतीबद्दल बोलताना दिग्दर्शिका आणि निवेदिका पद्मश्री राव म्हणाल्या, हा कार्यक्रम केवळ इतिहास कथन नाही, तर इतिहास आपल्याला आज काय शिकवतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. ‘स्वराज्य एक दृष्टिकोन’ हीच या सादरीकरणाची मुख्य ताकद आहे.”
या उपक्रमाचे लेखक, गीतकार आणि संगीतकार अनिल नलावडे म्हणतात,“संगीत शिवस्वराज्यगाथा म्हणजे केवळ घटनांची मांडणी नाही, तर त्या मागच्या भावना आणि मूल्यांचा प्रखर अनुभव आहे. संगीत आणि कवितांद्वारे प्रेक्षकांना त्या काळाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

या कार्यक्रमात नचिकेत देसाई, श्रीरंग भावे, केतकी भावे-जोशी आणि स्वतः अनिल नलावडे यांची संगीत सादरीकरणे अनुभवायला मिळणार आहेत. संकल्पना, गीत, संगीत आणि पटकथा अनिल नलावडे यांची असून निवेदन आणि दिग्दर्शन पद्मश्री राव यांनी केले आहे.

‘हमारा बजाज’चा आवाज हरपला; गायक विनय मांडके यांनी वयाच्या 73 वर्षी घेतला अखेरचा श्वास

या उपक्रमानिमित्त आणखी एक आकर्षण म्हणजे “शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालन”. यामध्ये १५० निवडक चित्रकाव्यांचे दालन सिंगापूर येथे उभे करण्यात येत आहे. अनिल नलावडे यांच्या कवितांसोबत पद्मश्री राव यांनी तयार केलेल्या एआय-आधारित शिवचरित्राचा यात समावेश आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना शिवचरित्रातील प्रसंगानुरूप एक वेगळा अनुभव मिळेल.

रणवीर सिंह ठरणार हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला ‘1000 कोटींचा टायटन’; बॉक्स ऑफिसवर रचणार नवा इतिहास!

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे, पण जागा मर्यादित असल्यामुळे पूर्व-नोंदणी आवश्यक आहे. विशेष म्हणजे या शिवसोहळ्यासाठी प्रेक्षकांनी पारंपरिक वेशभूषेत येण्याचे आवाहनही आयोजकां तर्फे करण्यात आले आहे.कार्यक्रमाची सांगता भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळ्या’ने होणार आहे, जो प्रत्येकाच्या मनात कायमचा ठसा उमटवेल.

एकूणच, ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ ही केवळ एक प्रस्तुती नसून—ती स्वराज्याचा विचार, संस्कृती आणि शिवचरित्रातील मूल्ये जगभर पोहोचवणारा असा एक सुंदर उपक्रम आहे.

‘सईशा प्रॉडक्शन्स’ ही संस्था गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे.

‘संगीत शिवस्वराज्यगाथा’सारख्या कार्यक्रमांसोबतच ‘शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालन’ आणि ऐतिहासिक अभ्यासू सहली यांसारख्या उपक्रमांद्वारे ही संस्था विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात सांस्कृतिक जागरूकता आणि मूल्याधारित शिक्षण पसरवत आहे.

 

Web Title: The musical presentation sangeet shiv swarajya gatha is being performed in singapore for the first time outside india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Singapore

संबंधित बातम्या

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
1

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
4

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.