Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रद्धा, अध्यात्म आणि भावनांचा सुंदर संगम, केदार शिंदे यांची नवी कलाकृती ‘गणा धाव रे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘बी-लाईव्ह प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत आणि 'कलश एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड' निर्मित ‘गणा धाव रे’ हा मराठी चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 21, 2026 | 12:25 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा नवा चित्रपट ‘गणा धाव रे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट श्रद्धा, अध्यात्म आणि मानवी भावनांवर आधारित आहे. हा चित्रपट आशयघन आणि वेगळ्या कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या टीमकडून तयार केला जात आहे. चित्रपटाची निर्मिती सूरज सिंग, वर्षा कुकरेजा, चैतन्य प्रवीण राणे आणि रिचर्ड पीटर्स यांनी केली आहे.सूरज सिंग यांना चित्रपट निर्मिती क्षेत्रातील दोन दशकांहून अधिक अनुभव आहे. याआधी त्यांनी अनेक यशस्वी प्रकल्पांमध्ये काम केले असून, तोच अनुभव आणि दृष्टीकोन या नव्या चित्रपटातही पाहायला मिळणार आहे.एक वेगळा आणि अर्थपूर्ण विषय घेऊन येणारा ‘गणा धाव रे’ लवकरच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील आणि प्रभावी कथनशैलीसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक केदार शिंदे करत आहेत. प्रेक्षकांच्या भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या कथा सादर करण्यात प्रवीण असलेल्या शिंदे यांनी या वेळी श्रद्धा आणि अध्यात्माशी निगडित विषय हाताळला आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, “हा विषय माझ्यासाठी केवळ कथा नसून, माझ्या श्रद्धेशी आणि भावविश्वाशी जोडलेला आहे. सहसा आपण कथा निवडतो; मात्र या वेळी या कथेनेच मला निवडले,” असे त्यांनी नमूद केले.

कोकणातील पार्श्वभूमीवर उलगडणारा ‘गणा धाव रे’ हा एक आध्यात्मिक आणि नाट्यमय चित्रपट असून, दंतकथा, भक्ती आणि माणुसकी यांच्या भावविश्वात गुंफलेली कथा यात पाहायला मिळणार आहे. एका सामान्य माणसाच्या असामान्य श्रद्धेभोवती फिरणारी ही कथा, त्या श्रद्धेची ताकद, तिचा प्रभाव आणि तिच्यामागील भावनिक प्रवास यांचा वेध घेते. गणपती बाप्पांवरील नितांत श्रद्धा, गावकुसातील परंपरा आणि सामूहिक भावविश्व यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटातून करण्यात येणार आहे.

कल्पनारंजन आणि वास्तव यांचा सुरेख मेळ साधत, एका भक्त आणि दैवतामधील नात्याचा सूक्ष्म आणि भावपूर्ण शोध या कथेतून घेण्यात आला आहे. कोकणातील सण-उत्सव, परंपरा आणि स्थानिक जीवनपद्धती यांची मांडणी चित्रपटाला अधिक समृद्ध बनवते. भावनिक पातळीवर प्रेक्षकांना जोडणारी आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी अशी ही कथा असल्याचे दिसून येते.

PM मोदींच्या विधानाने खळबळ; भारतात येणार का कोरियन स्टार्स? K-Pop आणि K-Drama चाहत्यांसाठी मोठी खुशखबर

‘गणा धाव रे’ हा केवळ एक चित्रपट नसून श्रद्धा, विश्वास आणि माणुसकी यांच्यातील नात्याचा अर्थपूर्ण प्रवास मांडणारा चित्रपट आहे.या चित्रपटात प्रभावी आशय, सांस्कृतिक मांडणी आणि भावनिक कथा पाहायला मिळणार आहे. कोकणातील पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना वेगळा अनुभव देईल. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भावनांना स्पर्श करणारा ठरेल आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: The new film gana dhav re by renowned marathi film industry director kedar shinde is set to be released soon for audiences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Entertainement News
  • kedar shinde
  • marathi movie

संबंधित बातम्या

Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, कलाकार-तंत्रज्ञांच्या सुखासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं!
1

Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, कलाकार-तंत्रज्ञांच्या सुखासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं!

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
2

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव
3

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
4

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.