Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बिग बॉस मराठी’ फेम आयुष संजीव आणि अनुश्री मानेला चढलीय प्रेमाची झिंग, ‘तुझ्या पिरमाचा नाद खुळा’गाण्याने जिंकले मनं

’तुझ्या पिरमाचा नादखुळा’ गाण्याच्या यशानंतर आयुष संजीव आणि अनुश्री मानेने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री केली आहे. हे दोघेही एकत्र 'बिग बॉस' च्या घरात कल्ला करताना दिसणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 16, 2026 | 04:11 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘बिग बॉस मराठी’ मध्ये आयुष संजीव आणि अनुश्रीची एन्ट्री
  • ‘तुझ्या पिरमाचा नाद खुळा’गाण्याने जिंकले मनं
  • ‘तुझ्या पिरमाचा नाद खुळा’ गाण्याला मिळाला भरभरून प्रतिसाद
हळूच येणाऱ्या प्रेमाने सोशल मीडियावर नाद खुळा केला आहे. हो, असं बोलण चुकीचं ठरणार नाही कारण तुझ्या पिरमाचा नाद खुळा’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होताना दिसत आहे. अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री अनुश्री माने ही जबरदस्त जोडी या रोमँटिक गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. गाण्याची हवा झाल्यानंतर आता ही जोडी ‘बिग बॉस मराठी’ मध्येही झळकत आहे. एकमेकांच्या प्रेमात बेधुंद आलेल्या या प्रेमीयुगुलाची रोमँटिक झलक या गाण्याद्वारे पाहायला मिळाली आहे.

या गाण्याची खास बाजू म्हणजेच या गाण्याचं शूटिंग लोकेशन. या रोमॅंटिक गाण्याची दिग्दर्शिका ज्योत्स्ना सुचिता संजय पेठे यांनी जबाबदारी उत्तमरीत्या पेलवली आहे हे त्या गाण्यातून समोर आलंच आहे. मात्र त्यांनी निवडलेल्या लोकेशनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. तसेच या दोघांची जोडी देखील लोकांना आवडलेली दिसत आहे.

Mastiii 4 OTT Release: ‘मस्ती ४’ आता ओटीटीवर घालणार धुमाकूळ! जाणून घ्या कुठे आणि कधी होणार रिलीज?

‘तुझ्या पिरमाचा नादखुळा’ हे गाणं ग्रामीण भागात शूट झालं असून शहापूर जवळील अघई तानसा लेक या गावात शूट झालं आहे. गाण्याच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अडचणी पार करत ज्योत्स्ना सुचिता जयंत पेठे यांनी दिग्दर्शनाची उत्तम अशी बाजू सांभाळली आहे. गाण्यातील दृश्य नयनरम्य असून अत्यंत अचूक रित्या हे गाणं टिपण्यात आले आणि दिग्दर्शित करण्यात आले आहे. हे गाणं प्रदर्शित होताच या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

गाण्याबाबतचा अनुभव शेअर करताना निर्माती, दिग्दर्शिका ज्योत्स्ना म्हणाल्या, “तुझ्या पिरमाचा नाद खुळा’ या गाण्याला मिळालेला प्रतिसाद पाहून खरंच खूप छान वाटतंय. दिग्दर्शिका आणि निर्माती अशा दोन्ही बाजू या गाण्यासाठी जेव्हा मी सांभाळत होते तेव्हा अनेक अडचणी आल्या पण त्यावर मात करत हा यशस्वी प्रयत्न पूर्ण झाला. कलाकार, संपूर्ण टीमची अर्थातच खूप मदत झाली प्रत्येक वेळी नव्याने काहीतरी शिकायला मिळालं आणि या गाण्याच्या चर्चेबरोबरच दिग्दर्शिका म्हणून माझ्या दिग्दर्शनाचही कौतुक होतंय हे खरंच मला भारावून टाकणार आहे”. असे त्या म्हणाल्या.

एमी पुरस्कार विजेता Owen Cooper ने पुन्हा रचला इतिहास, वयाच्या १६ व्या वर्षी गोल्डन ग्लोबचा जिंकला किताब

‘तुझ्या पिरमाचा नाद खुळा’ हे गाण ज्योत्स्ना सुचिता संजय पेठे दिग्दर्शित असून निर्माती म्हणूनही त्यांनी या गाण्याची धुरा पेलवली आहे. हर्षवर्धन वावरे आणि सायली कांबळे या दोघांनी त्यांच्या सुमधूर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. तर राजेंद्र साळुंखे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याचे बोल निखिल साठे लिखित आहेत. अल्पावधीतच युट्यूबवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे गाणं झी मराठी चॅनेलवर आऊट झाले आहे.

Web Title: The song tuzya pirmacha naad khula by ayush sanjeev and anushree mane received an overwhelming response from the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
1

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
2

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री
3

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
4

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.