Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई–मुलाच्या नात्याला स्पर्श करणारा ‘उत्तर’चा दमदार ट्रेलर लाँच, सोहळ्याला तनुजा आणि काजोल या मायलेकींच्या उपस्थिती

उत्तर’या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून या लाँचने चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 29, 2025 | 02:25 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सध्या चर्चेत असलेल्या मराठी चित्रपट ‘उत्तर’चा ट्रेलर लाँच नुकताच पार पडला आहे. हा सोहळा विशेष बनला कारण सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा आणि काजोल या मायलेकींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. ट्रेलर ‘आईला माहीत असतं!’ या वाक्याने आणि ‘हो आई!’ या गाण्याने सगळीकडे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपट आई–मुलाच्या नात्यावर आधारित असून, आजच्या काळातील या नात्याची कहाणी प्रेक्षकांसमोर मांडली आहे. ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळी काजोल आणि तनुजाने प्रेक्षकांना प्रेमळ आवाहन करत सांगितले की, हा चित्रपट ‘आईसोबत’ किंवा ‘आईसाठी’ नक्की पाहावा. या लाँचने चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

उत्तर चित्रपटाच्या या ट्रेलरचं मुख्य वैशिष्ट्य आहे ते यातील आई आणि मुलाचे संवाद जे आजच्या घडीतील प्रत्येक आई आणि मुलाला लागू होतील असेच आहेत. यासोबतीनेच सुंदर चित्रीकरण आणि साउंडवर केलेली विशेष मेहनत ह्या सगळ्यानेच सिनेमाच्या ट्रेलरचा परिणाम अतिशय गहिरा झाला आणि प्रत्येकाचं मन आईबद्दलच्या सुंदर भावनांनी भरून गेलेलं दिसलं.

‘उत्तर’मध्ये रेणुका शहाणे आईच्या तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत ऋता दुर्गुळे आणि एका खास भूमिकेत निर्मिती सावंत सुद्धा दिसणार आहेत, या शिवाय पहिल्यांदाच ‘अनमिस’नावाचं एक एआय पात्र सुद्धा यात झळकणार आहे. ‘डबलसीट’, ‘फास्टर फेणे’ या सारखे महत्वाचे चित्रपट आणि ‘दोन स्पेशल’, ‘भूमिका’ सारखी क्लासिक नाटकं देणाऱ्या क्षितिज पटवर्धन यांनी उत्तरमध्ये कथा, पटकथा लिखाणासोबत पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा ट्रेलरचे कौतुक करताना म्हणाल्या, ‘’या चित्रपटाचे नावच खूप महत्त्वाचे आहे. आईकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. हा ट्रेलर खूपच सुंदर झाला असून तो मनाला स्पर्श करणारा आहे. ट्रेलरमधून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली असून हा चित्रपट मी नक्कीच बघणार आहे.’’
अभिनेत्री काजोल म्हणाल्या, ‘’ मला ट्रेलर खूप आवडला. आई आणि मुलाच्या सुंदर नात्यावर आधारित हा चित्रपट असला तरी त्याला आजच्या काळातील तंत्रज्ञानाचीही जोड आहे. तंत्रज्ञानाचा नात्यावर कसा परिणाम होतो, याचे भावनिक चित्रण यात दिसतेय. खूप छान विषय यात हाताळण्यात आला आहे. मी आईसोबत लवकरात लवकर हा चित्रपट पाहाणार आहे.’’

 

ट्रेलरला मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल क्षितिज पटवर्धन म्हणाले की, “हा सिनेमा माझंच नाही तर मराठी सिनेमाचं अनेक प्रश्नांना, शंकांना दिलेलं उत्तर आहे! आणि आईच्या प्रेमाला दिलेलं एक छोटीसं रिटर्न गिफ्ट आहे”

बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता होणार बाबा, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी दिली गोड बातमी

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, “क्षितिजने जेव्हा या चित्रपटाची गोष्ट मला ऐकवली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता आपण ही गोष्ट करतोय हे मी त्याला सांगितलं. आपण कायमच म्हणतो की मराठी चित्रपटाची गोष्ट हीच त्याचा हिरो असतो. इथे गोष्टीसोबतच आई ही या चित्रपटाचा हिरो आहे आणि रेणुका शहाणे यांनी नेहमीप्रमाणे यातील आईची ही भूमिका सुंदरपणे साकारली आहे. हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाला आवडेल असा विश्वास आम्हाला आहे.”

Suraj Chavan Wedding: भावाच्या हळदीत जान्हवीचा जबरदस्त डान्स, ‘झापुक झुपूक’ वर तुफान नाचली, Video पाहा

झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून १२ डिसेंबरला ‘उत्तर’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Trailer launch of the film uttar which touches on the mother son relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं
1

‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं

Vijay Deverakonda आणि Rashmika ने शेअर केले संगीत नाईट्सचे फोटो; कपलचा रोमँटिक डान्स व्हायरल, पाहा Inside Photo …
2

Vijay Deverakonda आणि Rashmika ने शेअर केले संगीत नाईट्सचे फोटो; कपलचा रोमँटिक डान्स व्हायरल, पाहा Inside Photo …

DALIMB: रंगांमागे दडलंय गूढ रहस्य; मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलं चित्रपटाचं पहिलं पोस्टर, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!
3

DALIMB: रंगांमागे दडलंय गूढ रहस्य; मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलं चित्रपटाचं पहिलं पोस्टर, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

‘तो यासाठी लायक आहे…’, संगीतासोबत घटस्फोटाच्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचे विधान चर्चेत, विजय थलापतीबद्दल म्हणाली….
4

‘तो यासाठी लायक आहे…’, संगीतासोबत घटस्फोटाच्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचे विधान चर्चेत, विजय थलापतीबद्दल म्हणाली….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.