Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुंबाडची मंजुळा’चा रहस्यमय टीझर रिलीज; भल्यामोठ्या स्टारकास्टने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

‘तुंबाडची मंजुळा’ हा मराठी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. तसेच ‘तुंबाडची मंजुळा’ येत्या ५ जूनला प्रदर्शित होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 07, 2026 | 01:03 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘तुंबाडची मंजुळा’चा रहस्यमय टीझर रिलीज
  • भल्यामोठ्या स्टारकास्टने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष
  • ‘तुंबाडची मंजुळा’ कधी होणार प्रदर्शित?
 

कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी, गूढतेने वेढलेली आणि प्रेक्षकांच्या मनात पहिल्या पोस्टरपासूनच कुतूहल निर्माण करणारी ‘तुंबाडची मंजुळा’ हा मराठी चित्रपट आता अधिक चर्चेत आली आहे. झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचा धमाल आणि उत्कंठावर्धक टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

५ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या टिझरमध्ये ‘मंजुळा’ या नावाभोवती निर्माण झालेलं गूढ वातावरण, गावकऱ्यांमध्ये पसरलेली भीती आणि त्यातून उडालेली तारांबळ प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. कोकणातील एका गावाची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात एकाहून एक सरस आणि वेगळ्या भूमिकेत कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. यात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, अथर्व रुके, प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी यांचा समावेश आहे.

‘तारक मेहता का…’ फेम Disha Vakani वर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने भावुक झाली अभिनेत्री

यातही एका भविष्य सांगणाऱ्या गुरुजीच्या वेशात दिसणारे मकरंद अनासपुरे यांचा लुक, त्यांची देहबोली आणि संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच सगळ्यात जास्त आकर्षणाचा विषय ठरली आहे टीझरच्या शेवटी एका अर्धवट बंद दाराआड उभी दिसणारी सई ताम्हणकर. यामध्ये सईची काय भूमिका असेल ? याबद्दल सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे.

 

या चित्रपटाविषयी झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, “यापूर्वी प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघता या टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता कशी वाढेल यावर आम्ही भर दिला. आता प्रदर्शित झालेल्या टिझरमधून दिसणारी कलाकारांची फौज, त्यांचे धमाल संवाद हे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. मुळात कोकण प्रांत आणि कोकणातील लोकांच्या गजाली हा कायमच आपल्या आवडीचा विषय असतो. कोकणातील अशाच एका गावाची, त्यातील गावकऱ्यांची आणि गावात घडणाऱ्या एका अद्भुत घटनेची गोष्ट म्हणजे तुंबाडची मंजुळा हा चित्रपट. सर्वच स्तरांतील, वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल आणि सहकुटुंब बघता येईल असा हा मनोरंजक चित्रपट झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर झी स्टुडिओजने पूर्णपणे निर्मितीची धुरा सांभाळली आहे याचा आनंद आहे.” असे ते म्हणाले आहे.

‘सरके चुनर’ गाण्यामुळे वाढल्या संजय दत्त आणि नोराच्या अडचणी; राष्ट्रीय महिला आयोग कडून बजावले समन्स

ऋषिकेश तुरई यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने केले आहे. झी स्टुडिओजतर्फे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या ५ जून रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Web Title: Tumbdchi manjula marathi movie teaser release strong star cast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Gen Z Financial Crisis : दिखाव्यासाठी कर्ज अन् EMI चा डोंगर! ‘उधाराच्या श्रीमंतीत’ जगतेय जेन झी; ‘या’ चुका पडतील महागात
1

Gen Z Financial Crisis : दिखाव्यासाठी कर्ज अन् EMI चा डोंगर! ‘उधाराच्या श्रीमंतीत’ जगतेय जेन झी; ‘या’ चुका पडतील महागात

फ्लॉपचा शिक्का OTTवर पुसला! ‘या’ चित्रपटाला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, नंबर 1 वर ट्रेंडिंग
2

फ्लॉपचा शिक्का OTTवर पुसला! ‘या’ चित्रपटाला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, नंबर 1 वर ट्रेंडिंग

Varanasi Airport Firing Case : वाराणसी विमानतळावर अचानक गोळीबार! विमानात शस्त्रे नेण्याचा नियम नक्की काय आहेत?
3

Varanasi Airport Firing Case : वाराणसी विमानतळावर अचानक गोळीबार! विमानात शस्त्रे नेण्याचा नियम नक्की काय आहेत?

Gunmaster G9: इमरान-जिनिलियाची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर! ‘आवारापन २’नंतर अभिनेत्याचा नवा प्रोजेक्ट चर्चेत
4

Gunmaster G9: इमरान-जिनिलियाची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर! ‘आवारापन २’नंतर अभिनेत्याचा नवा प्रोजेक्ट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.