Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उमेश आणि प्रियाच्या जोडीने पुन्हा जिंकले मन! ‘हे काय नवीन?’ मध्ये उलघडणार प्रगल्भ नात्याची भावनिक गोष्ट

मराठी इंडस्ट्रीमध्ये नेहमीच चर्चेत असलेली जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर चमकले आहे. या जोडप्यांची नुकतीच प्रदर्शित झालेली वेब सीरिज ‘हे काय नवीन?’ चर्चेत आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 31, 2026 | 08:34 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

उमेश आणि प्रिया ही जोडी नेहमीच प्रेक्षकांच्या अगदी जवळची आणि आपुलकीची वाटली आहे. अशातच या दोघांची आगामी वेब सीरिज ‘हे काय नवीन?’ झी ५ वर स्ट्रीम झाली आहे. या आगामी वेब सीरिजमधून या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या वेब सीरिजची कथा थोडी वेगळी आणि हटके असून, चाहत्यांना ही प्रगल्भ नात्याची गोष्ट भावली आहे.

“आणि काय हवं” पासून “हे काय नवीन?” पर्यंत या जोडप्याचा प्रवास कसा झाला आहे? हे या कथेमध्ये पाहायला मिळाले आहे. “आणि काय हवं” ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता “हे काय नवीन?” देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता हे जोडपं चाळिशीत असल्याचे दिसून आले आहे. जास्त प्रगल्भ, वास्तवातील समस्या, प्रश्न आणि जबाबदाऱ्या यांचा सामना करत आहेत. या प्रवासाची खरी झलक म्हणजे, ते या सगळ्या परिस्थितींना एकत्र कसं सामोरं जातात थोड्या विनोदाने, उबदारपणाने आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत. हे सगळं वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

Nawazuddin Siddiqui यांच्या ‘मैं एक्टर नहीं हूं’चा टीझर रिलीज; चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

“हे काय नवीन?” ची काय आहे कथा ?

“हे काय नवीन?” मध्ये प्रिया बापटने रमा हे पात्र साकारलं आहे. तसेच, उमेशने आदित्यचं पात्र साकारले आहे. हे दोन्ही जोडपं वयाच्या चाळिशीत पोहचले आहे. येथून सुरु होणार त्यांचा नवा प्रवास या कथेत पाहायला मिळाला आहे. जिथे रमा आणि आदित्यचं नातं केवळ प्रेमापुरतं मर्यादित राहत नाही, तर जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि वैयक्तिक निर्णय यांचाही तितकाच प्रभाव दिसून येतो.

रमा आणि आदित्य या दोघांकडूनही त्यांच्या कुटुंबाला बाळाची अपेक्षा असते, परंतु या दोघांनाही ते नको असते. कथेच्या पुढे रमा आपला स्वतःचा व्यवसाय करायचे ठरवते. आणि तो लगेच सुरूही करते. परंतु, हे सगळं सुरु होताना झालेला गोंधळ, तिचे कुटुंबासोबत बाळावरून झालेले वाद, आणि या सगळ्यामुळे तिच्यात आणि आदित्यच्या नात्यात होणार दुरावा. हे सगळं कथेत नव्या पद्धतीत मांडण्यात आले आहे.

वरुण नार्वेकर यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. वरुण नार्वेकर यांच्या लेखनाने सध्याच्या दैनंदिन नात्यांकडे पाहण्याची या नव्या पिढीची नजर आणि त्यातून प्रामाणिक भावनांचे बारकावे त्यांनी आगामी अचूक मांडले आहेत. कथेत विनोद आणि संवेदनशीलता देखील खूप उठून दिसते आहे. वेब सीरिज आज झी 5 मराठीवर प्रदर्शित झाली असून उमेश आणि प्रिया यांची केमेस्ट्री पुन्हा प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी त्यांच्या भूमिकांमध्ये प्रचंड सहजता आणली आहे. दोघांमधील केमेस्ट्री ही या सीरिजची सर्वात मोठी ताकद ठरते. त्यांच्या संवादांमध्ये वास्तवतेचा स्पर्श आहे, जो प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्यातील क्षणांची आठवण करून देतो.

‘Dhurandhar 2’ नंतर येणार ‘धुरंधर 3’? कर्नल भूपिंदर शाही यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले, ”आता हमजा नाही तर…”

‘हे काय नवीन?’ ही केवळ एक प्रेमकथा नाही, तर नात्यांच्या बदलत्या परिभाषेची गोष्ट आहे. आजच्या पिढीतील जोडप्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना ही सीरिज थेट भिडते. उमेश आणि प्रिया यांच्या प्रभावी अभिनयामुळे ही कथा अधिक जिवंत वाटते.

 

Web Title: Umesh kamat priya bapat hey kay navin marathi web series stream on zee 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • Marathi News
  • Priya Bapat
  • Umesh Kamat

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
2

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
3

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
4

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.