Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’च्या मंचावर घुमणार मराठीचा हुंकार; गाजणार मराठीचा सन्मान!

डॉ. जब्बार पटेल यांना यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच अभिनेता चिन्मय मांडलेकरला मराठी पाऊल पडते पुढे पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 12, 2026 | 01:29 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीचा सर्वात मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणून ओळखला जाणारा ‘झी चित्र गौरव पुरस्कार 2026’ यंदा नव्या जोमाने आणि मराठमोळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. “मराठी गाजलंच पाहिजे” या घोषवाक्यासह साजरा होणाऱ्या या सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा ठसा आणि आधुनिकतेची झलक यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. झी चित्रगौरवच्या मंचावर मराठीचा अभिमान दुमदुमणार असून, मराठीचा हुंकार घुमणार आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कर्तृत्ववान कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे.

अरबाज पटेलसोबत निक्की तंबोलीने का सोडला नाही शो? बॉयफ्रेंडला दिला धोका ? अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण

यंदाच्या झी चित्रगौरव २०२६ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरेल ते म्हणजे जेष्ठ दिग्दर्शक ‘डॉ. जब्बार पटेल’, कला ही केवळ करमणूक नसते, ती विचारांची धगधगती मशाल असते हे आपल्या प्रत्येक कलाकृतीतून ज्यांनी नेहमी सिध्द केलं, असं आभाळा एवढं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय डॉ. जब्बार पटेल. पेशाने डॉक्टर असलेल्या पटेल यांनी आपल्या संवेदनशील दृष्टिकोनातून प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखली. मराठी रंगभूमीच्या पवित्र परंपरेतून चित्रपटाच्या विशाल पडद्यापर्यंत त्यांचा प्रवास हा केवळ यशाचा नाही, तर धाडस, अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीचा आहे. त्यांनी आपल्या कलाकृतीतून समाजाशी प्रामाणिक संवाद साधत अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न मांडले आणि प्रेक्षकांच्या मनात विचारांची नवी खिडकी उघडली.

त्यांचा पहिला चित्रपट सामना याने मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचा भक्कम प्रवेश घडवला आणि त्यानंतर सुरू झाला एक वादळी प्रवास. सिंहासन या चित्रपटातून सत्तेच्या पडद्यामागचे वास्तव त्यांनी प्रभावीपणे मांडले. उंबरठ आणि जैत रे जैत या चित्रपटांमधून स्त्रीच्या आत्मसन्मानाचा प्रश्न त्यांनी प्रभावीपणे मांडले. याशिवाय एक होता विदुषक मधून कलाकाराच्या आयुष्यातील मुखवट्यामागचे वास्तव दाखवले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाद्वारे त्यांनी भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वाची कथा जागतिक स्तरावर पोहोचवली. तसेच मुक्ता चित्रपटातून जातिव्यवस्थेबाबत धाडसी भाष्य करत समाजमनाला विचार करायला भाग पाडले.

अक्षय कुमारच्या ‘Bhooth Bangla’चा टीझर रिलीज; हॉरर-कॉमेडीचा तडका, ‘भूल भुलैया’ची दिसली झलक

तसेच, यंदा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या विशेष पुरस्काराचे मानकरी अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर ठरले आहेत. जिद्द, अभ्यास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गिरणगावाच्या संस्कारातून घडलेले चिन्मय मांडलेकर यांनी रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास आपल्या प्रतिभेच्या बळावर यशस्वी केला. मोरया, झेंडा, हलाल, गांधी गोडसे – एक युद्ध आणि काश्मीर फाइल्स यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. अभिनयाबरोबरच लेखन आणि दिग्दर्शनातही त्यांनी नवे प्रयोग करत स्वतःचा ठसा उमटवला आहे.

झी मराठी प्रस्तुत झी चित्रगौरव पुरस्कार २०२६ हा केवळ पुरस्कार वितरण सोहळा नसून मराठी संस्कृती, कला आणि प्रतिभेचा उत्सव आहे. या मंचावर मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा गौरव होत असताना नव्या पिढीतील कलाकारांनाही प्रेरणा मिळते. यंदाचा सोहळा मराठीच्या अभिमानाचा उत्सव ठरणार असून, मराठीचा हुंकार घुमणार आणि मराठी चित्रपटसृष्टीचा सन्मान दिमाखात साजरा केला जाणार आहे.

Web Title: Zee chitra gaurav puraskar 2026 dr jabbar patel lifetime achievement chinmay mandlekar marathi paul padte pudhe award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • marathi movie
  • Marathi News
  • zee marathi

संबंधित बातम्या

Paytm New Update : कोर्टाच्या धक्क्यानंतर पेटीएमचा मास्टरस्ट्रोक! कर्मचाऱ्यांना दिलं 4.48 लाखांहून अधिक शेअर्सचं गिफ्ट
1

Paytm New Update : कोर्टाच्या धक्क्यानंतर पेटीएमचा मास्टरस्ट्रोक! कर्मचाऱ्यांना दिलं 4.48 लाखांहून अधिक शेअर्सचं गिफ्ट

Elon Musk Net Worth : संपत्ती गडगडली, जिथे होते पुन्हा तिथेच आले मस्क! 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा हुकला; नेमका कसा बसला ब्रेक?
2

Elon Musk Net Worth : संपत्ती गडगडली, जिथे होते पुन्हा तिथेच आले मस्क! 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा हुकला; नेमका कसा बसला ब्रेक?

EPFO Scam Case: मोठा घोटाळा! ईपीएफओमध्ये 1816 कोटींची हेराफेरी! अनिल अंबानी आणि रिलायन्स कॅपिटलविरुद्ध FIR दाखल
3

EPFO Scam Case: मोठा घोटाळा! ईपीएफओमध्ये 1816 कोटींची हेराफेरी! अनिल अंबानी आणि रिलायन्स कॅपिटलविरुद्ध FIR दाखल

Zomato Swiggy vs Flipkart: आता फ्लिपकार्टवर ऑर्डर करा तुमचं आवडतं जेवण! झोमॅटो अन् स्विगीपेक्षा मिळतील भारी डिस्काउंट्स?
4

Zomato Swiggy vs Flipkart: आता फ्लिपकार्टवर ऑर्डर करा तुमचं आवडतं जेवण! झोमॅटो अन् स्विगीपेक्षा मिळतील भारी डिस्काउंट्स?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.