Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील बॉम्बस्फोटवर आधारित ‘मिशन मुंबई’ चित्रपट मोठ्या पडद्यावर, दहशतवादाविरुद्धच्या थरारनाट्याचा ‘या’ तारखेला होणार उलगडा

मुंबई शहराला हादरवून सोडणाऱ्या त्या काळ्या दिवसांनंतरची थरारक सत्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न करणारा एक नवाकोरा चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 15, 2026 | 10:34 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘मिशन मुंबई’ चित्रपटाचे दमदार पोस्टर प्रदर्शित
  • दहशतवादाविरुद्धच्या थरारनाट्याचा उलगडा होणार
  • २०० किलो आरडीएक्स गेलं कुठे?, ‘मुंबई मिशन’मधून उलगडणार मोठं सत्य
मुंबई शहराला हादरवून सोडणाऱ्या त्या काळ्या दिवसांनंतरची थरारक सत्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न करणारा एक नवाकोरा चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे. आरडीएक्सचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी केलेली जीवघेणी मोहीम आणि त्यामागचा संघर्ष या पोस्टरमधून प्रकर्षाने दिसून येत आहे. पोस्टरमध्ये एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील कलाकाराचा आक्रमक अंदाज पाहायला मिळत असून चित्रपटातील ॲक्शन आणि गांभीर्याची साक्ष देत आहे. मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी ३०० किलो आरडीएक्स पैकी १०० किलो आरडीएक्स वापरलं गेलं, तर २०० किलो आरडीएक्स गेलं कुठे?, याचा शोध ‘मुंबई मिशन’मधून उलगडणार आहे. सत्य घटनेवर प्रेरित होऊन हा काल्पनिक सिनेमा बनविण्यात आला आहे.

Sushant Singh Rajput’s च्या बहिणीने घेतली नवी प्रॉपर्टी; चावी हातात येताच घडली ‘विचित्र’ गोष्ट

भीषण आरडीएक्स (RDX) शोध मोहिमेवर प्रेरित थरारनाट्य

‘रेविकांता फिल्म्स निर्मित’ आणि ‘आकात डिस्ट्रिब्युशन’ प्रस्तुत, बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘मिशन मुंबई’ चे अधिकृत पोस्टर आज सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यावेळच्या भीषण आरडीएक्स (RDX) शोध मोहिमेवर प्रेरित असलेलं हे थरारनाट्य येत्या १५ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अभिनेते अजॉय शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत त्यांना मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे.

चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी लेखक चंद्रकांत विसपुते

‘मिशन मुंबई’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माती सौ. कांता शर्मा यांनी सांभाळली आहे. तर दिग्दर्शक चंद्रकांत विसपुते आणि कैलाश पवार यांनी दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. ‘आकात डिस्ट्रिब्युशन’ प्रस्तुत हा चित्रपट आहे. तर चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी लेखक चंद्रकांत विसपुते यांनी सांभाळली आहे. तसेच संगीत समीर खोले, मंदार कीर, रवींद्र खरात, विकी वाघ यांचे आहे. तर चित्रपटातील गाण्यांना गायक सुदेश भोसले, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी साईराम, विकी वाघ, दिशा सुतार यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. तर गीतकार म्हणून कृपेश, विकी, राजीव, बिपीन यांनी बाजू हाताळली. तसेच कार्यकारी निर्माता म्हणून बाबासाहेब पाटील यांनी बाजू पाहिली आहे.

चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक चंद्रकांत विसपुते म्हणाले की, “मुंबईच्या इतिहासातील तो काळ आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. सत्य घटनेवर प्रेरित होऊन ‘मिशन मुंबई’ च्या माध्यमातून आम्ही त्या शोध मोहिमेतील धाडस आणि पोलीस दलाचे योगदान काल्पनिकदृष्ट्या पडद्यावर मांडत आहोत. १५ मे रोजी हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होईल”.

यूट्यूबर-कॉमेडियन Samay Raina कोणाच्या प्रेमात? स्वतःच चेहरा केला रिवील, चाहत्यांना बसला धक्का

Web Title: Mission mumbai marathi film vijay patkar new thriller movie coming soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • marathi movie
  • Mumbai Attack
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत
1

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
2

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता”! मराठी झी ५ वर लवकरच होणार प्रदर्शित
3

पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता”! मराठी झी ५ वर लवकरच होणार प्रदर्शित

दोन मित्र, एक धोकादायक मिशन आणि भरपूर धमाल; VIBE चा Trailer Out! Kunal Khemu च्या ॲक्शन-कॉमेडीचा धमाका
4

दोन मित्र, एक धोकादायक मिशन आणि भरपूर धमाल; VIBE चा Trailer Out! Kunal Khemu च्या ॲक्शन-कॉमेडीचा धमाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.