(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
शाहिद कपूर आणि पूजा हेगडे स्टारर ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘देवा’ आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शाहिद एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट मल्याळम चित्रपट निर्माते रोशन अँड्र्यूज यांनी दिग्दर्शित केला आहे. हे त्याचे बॉलिवूड पदार्पण आहे. ‘देवा’ ही एक अॅक्शन-थ्रिलर आणि सूडाची कथा आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांचे मत समोर आले आहे. जाणून घेऊयात पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा काय प्रतिसाद मिळाला आहे.
राम गोपाल वर्मा यांनी ‘सिंडिकेट’बद्दल पसरलेल्या अफवांचे केले खंडन, पोस्ट शेअर करत म्हणाले…
काय आहे चित्रपटाची कथा?
‘देवा’ मध्ये शाहिदचा पूर्णपणे नवीन लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. सोशल मीडियावर देवाला मिळणाऱ्या सुरुवातीच्या प्रतिक्रियांवरून असे दिसते की ही कथा खूपच मनोरंजक आणि चकित करत असल्याने ती बॉक्स ऑफिसवर आपले स्थान टिकवून ठेवू शकते. चित्रपटाची कथा एका बंडखोर पोलिस अधिकाऱ्याभोवती फिरते. या पोलिस अधिकाऱ्याला एका हाय-प्रोफाइल केस सोडवण्याचे काम सोपवले जाते आणि तो केस तपासत असताना, फसवणूक, विश्वासघात आणि धोकादायक कटाचे थर उघड होतात. या वर आधारित ही कथा प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे.
#Deva Review 🚨
🔥 MASTERPIECE ALERT! ⭐ ⭐ ⭐ ⭐ #ShahidKapoor delivers a career-defining performance as the fierce & unhinged cop, and Rosshan Andrrews crafts an absolute banger of an action thriller! The intensity, #Deva a must-watch.#planecrash pic.twitter.com/F9HGX9AaF1
— Marjina Sekh (@imMarjina) January 31, 2025
शाहिद कपूर-पूजा हेगडे यांची केमिस्ट्री
‘देवा’ चित्रपटात शाहिद कपूरची पूजा हेगडेसोबतची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली आहे. पूजा पडद्यावर खूप कमीवेळा चाहत्यांना पाहायला मिळते आहे, पण तिच्याकडे जे काही आहे ते तिने उत्तम अभिनय केला आहे. चाहत्यांना हा चित्रपट आवडतो आहे. आणि पूजा आणि शाहिदला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे. सोशल मीडियावर वापरकर्ते देवा बद्दल सतत त्यांचे मत शेअर करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘पूजाच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट’, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘देवा पाहिलाच पाहिजे’. असे लिहून चाहत्यांनी या चित्रपटाला प्रतिसाद दिला आहे.
अभिमानास्पद! मुंबईतल्या रस्त्याला ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे नाव; अभिनेते अजिंक्य देव भावूक
हा चित्रपट ‘मुंबई पोलिस’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.
शाहिद कपूरचा ‘देवा’ हा चित्रपट आज म्हणजेच ३१ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ‘मुंबई पोलिस’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन रोशन अँड्र्यूज यांनी केले आहे. रोशन यांनी ‘सॅल्यूट’ आणि ‘कायमकुलम कोचुन्नी’ सारखे अनेक मल्याळम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. बॉबी-संजय यांनी हा चित्रपट लिहिला आहे. तर ‘मुंबई पोलिस’ या मल्याळम चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, जयसूर्य आणि रहमान मुख्य भूमिकेत दिसले होते.