यश अरुंधती देशमुख ही ओळखच खूप भारी आहे. ‘आई कुठे काय करते’ या सिरीअलमुळे मला ही नवी ओळख मिळाली. मला ही ओळख जी मिळाली आहे या सगळ्यासाठी मी खूपच कृतज्ञ आहे. मला खूप त्याच्याबद्दल छान वाटतं आणि याच सगळं श्रेय लेखक, चॅनल आणि संपूर्ण टीमला जांतं. या मालिकेमुळे मी लोकांच्या घराघरात पोहचलो आणि त्यातून चांगला संदेश जातो आहे. आई आणि मुलगा यांचं नातं कसं असावं? तिच्यासाठी काय काय करावं? एक आदर्श मुलगा म्हणून काय करायला हवं? यागोष्टी मलाही शिकता आल्या आणि ते लोकही बघतायत याचा मला आनंद आहे. मधुराणी खूपच उत्तम अभिनेत्री आहे. सहकलाकार म्हणूनही छान आहे. कधीही सीन करताना चिडत नाही. खूप मैत्रीपूर्ण नात्यातून आमचं ट्युनिंग जमलं आहे.
आमची चांगली मैत्री आणि ट्यनिंग असल्यामुळे सीन करताना आम्हाला खूप सोपं झालं आणि तेव्हा आम्ही कोरोनाच्या काळात सीन करत होतो. त्याकाळात माझं आणि मधुराणीचं बॉण्डिंग असणं खूप महत्त्वाचं होतं. जे आमच्यात तयार झालं. तसंच आमचे लेखक- दिग्दर्शक यांनीदेखील सुंदर सीन लिहले त्यामुळे हे नातं छान प्रेक्षकांसमोर आलं. त्यांच्यामुळे आमचं आई-मुलांचं नातं अधिक घट्ट झालं आणि आता ऑफ स्क्रीनही आमचं नात छान आहे. मुलांचं संगोपन करताना आपल्या आईने बऱ्याच गोष्टींवर पाणी सोडलेलं असतं. तिच्या इच्छा अपुऱ्या राहिलेल्या असतात. पण त्याचा शोध घेणं आणि तिची कुठली इच्छा पूर्ण करायची राहिली आहे त्यासाठी काय करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. जे यश अरुंधतीसाठी करतो आहे. तिला पूर्ण पाठिंबा देत आला आहे. यश कायम अरुंधतीच्या सुखदुखात सोबत राहत आला आहे. हे गुण प्रत्येक मुलाने आत्मसात करावेत.
माझं आणि आईचं बॉण्डिंग खूप छान आहे. लहानपणापासून एका मैत्रिणीसारखं आमचं नातं आहे. आपण हक्काने आईकडे मनमोकळेपणाने बोलू शकतो . मनमोकळं करण्याची ती छान जागा असते. कारण ती तुम्हाला अंतर्बाह्य ओळखत असते. त्यामुळे चुकापण तेवढ्याच मोकळेपणाने तिला सांगू सांगतो जेवढं चांगल्या गोष्टी शेअर करतो. या क्षेत्रात मी आईमुळेच आलो. आई- बाबा त्यांचा व्यवसाय आणि नोकरी सांभाळून या क्षेत्रात कार्यरत होते. पण मला करिअर म्हणून या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी त्यांनीच पाठिंबा दिला. त्याची पायाभरणी त्यांनी लहानपणापासून केली. मी अगदी पाच वर्षांपासून बालनाट्य करत होतो. यासाठी आईने प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आत्मविश्वास उंचावला. मी जळगाव सारख्या छोट्या शहरात होतो.
त्या ठिकाणी तुमच्यात आत्मविश्वास पेरणं हे महत्त्वाचं होतं आणि तो आत्मविश्वास मला आईनेच दिला. त्यामुळेच मी आज मुंबईसारख्या मोठ्या शहरात नाव कमवू शकलो. आईने माझी पायाभरणी केली. आईचा रागीटपणा आणि तिची सकारात्मकता हे दोन गुण माझ्यामध्ये आले. तिने स्वत:च करिअर बाजूला ठेवून माझ्यासाठी आणि बहिणीसाठी पूर्ण वेळ दिला. तसंच आई कधी रागावली की, तिच्यासाठी मी चहा-कॉफी करतो. तेवढंच प्रेमाने तिला सॉरी बोलतो.
मुद्दाम वेगवेगळ्या विषयांवर बोलायला लागतो. त्यामुळे आई हळूहळू राग विसरते. आई आणि बायकोमध्ये माझं कधी सँडविच होत नाही. दोघीही मला खूप समजून घेतात. आई आणि पत्नीकडे मी माझं मन मोकळं करतो. खरंतर या दोन माझ्या जीवलग मैत्रिणी आहेत आणि दोघी मला पूर्ण ओळखत असल्यामुळे दोघी एकत्र येऊन मला माझी चूक दाखवतात. मी चौथीमध्ये खूप चांगले मार्क मिळवले होते. त्यावेळी आईने मला घड्याळ दिलं होतं. ते माझं पहिलं घड्याळ होतं. आता अभिनयक्षेत्रात चांगलं काम केलं की, आई नेहमीच शाबासकी देते तेच माझ्यासाठी गिफ्ट आहे. आता माझ्या सिरीअलमुळे आईचं पण कौतुक होतं. लोक तिला जाऊन म्हणतात की, मुलगा असावा तर यशसारखा. जेव्हा कुठल्याही कार्यक्रमात लोकांना कळतं की, ही यशची खरी आई आहे. तेव्हा लोकांचा गराडा तिच्याभोवती होतो. लोक तिच्यासमोर माझं कौतुक करतात तेव्हा तिला भारावून जायला होतं. पूर्वी मी कधी आईला रागारागात काहीतरी बोलून जायचो कारण ती आपली हक्काची असते. पण आपण पूर्ण विचार करत नाही की, आई असं का वागली? ती आपली काळजी का करत असते? आणि ही सिरीअल करत असताना मी तेच शिकलो की, आई खूप काही करते आणि ते जे काही सांगते. त्यात आपलं चांगलं व्हावं हाच तिचा हेतू असतो. त्यामुळे मी लक्षपूर्वक आईचं ऐकतो. आईसाठी मी नेहमीच काहीना काही करत आलो आहे आणि आता माझी इच्छा आहे की, मला माझ्या खर्चाने आईला परदेश दौऱ्यावर घेऊन जायचं आहे.
माझी आई खूपच मायाळू. जिथे रागवायला पाहिजे तिथे रागावणारी. खंभीरपणा पाहिजे तिथे खंभीर राहणारी. तसंच एखादी अशी परिस्थिती येते जिथे तिला दोन्ही बाजू सांभाळून घ्यावे लागतात. म्हणजे तिला नव-याचं पण ऐकावं लागतं आणि मुलांचपण ऐकायचं असतं.अशावेळी ती तटस्थपणे निर्णय घेते. आईमधला निर्भिडपणा आणि खोडकरपणा माझ्यात आला. आई मला सांगते की, ती लहानपणी खूप खोड्या करायची तसं मी पण लहानपणी खूप खोड्या करायचो. तसंच आमच्या घरात आम्ही सगळेच कलाकार आहोत. मी, संकर्षण कलाक्षेत्रात आलो पण मला वाटतं कर्मिशअल काम न करता आमच्या घरात जर कोणी उत्तम कलाकार असेल तर ती म्हणजे माझी आई.
कारण ती उत्तम नकलाकार आहे. आम्ही कर्मशिअल काम करतो. पण आई एखाद्या व्यक्तीची नक्कल करून तो माणून आपल्या डोळ्यासमोर आणते. ते तिला अत्यंत खुबीने जमतं. तिची विनोदबुध्दी कमालीची आहे. माझ्या आणि जे काही कलागुण आले ते आईकडूनच आले. ती अतिशय उत्तम कलाकार आहे. तसंच संकर्षण नेहमी म्हणतो की, झाड सुध्दा एखाद्या फळाला किंवा त्या भाज्यांना चव देत नसेल इतकी सुंदर चव आईच्या स्वयांपाकाला असते. त्यामुळे आईच्या हातचं सगळंच आवडतं. पण त्यातल्या त्यात तिच्या हातची पुरणपोळी आणि कटाची आमटी फार आवडते. लाहानपणी मी आईचा मार खूप खाल्ला आहे. मी खूपच खोडकर होतो. त्यामुळे मी आणि संकर्षणपैकी मीच आईचा फार मार खाल्ला आहे. कलाक्षेत्रात कधी काम असतं ,कधी नसतं. अशावेळी नैराश्य येतं. त्यामुळे आईला फोन केला. आई म्हणाली, ‘काळजी करू नकोस. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येत. प्रयत्न सोडू नकोस’.
माझी आई शिक्षिका होते. वडिल पण शिक्षक होते. आई शाळेमध्ये दहावीच्या मुलांना निरोप समारोप सोहळ्यात गाणी म्हणायची. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार…या गीतांनी ती मुलांना शुभेच्छा द्यायची. आई गाणं गात असे. माझा गाण्याचा काही पिंड नाही. मात्र अभिनयाचं तिच्याकडून बाळकडू मिळालं. तिने कधी अभिनय नाही केला पण मला नेहमी पाठिंबा दिला. एक तिची आठवण म्हणजे तिने मला हाताला धरुन आशा काळे यांचा सतीचंवाण सिनेमा बघायला घेऊन गेली आणि कालांतराने माझं पहिलं कमर्शिअल नाटक आशा काळे यांच्यासह ‘घर श्रीमंतांचं’ होतं. १९९९ साली माझी आई देवाघरी गेली. तिच्या दोन्ही किडन्या काम करत नव्हत्या. तिचे ५१० डायलेसिस झाले. तिची जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती होती. त्यामुळे ती ५ वर्षे डायलेसिसवर होती. त्यानंतर ती गेली. ती मला नेहमी म्हणायची की, आपल्याला घेणारे हात व्हायचं नाही, आपल्याला देणारे हात व्हायचं आहे. सणावाराला नातेवाईकांच्या घरी जाण्याऐवजी सगळ्या नातेवाईकांनी माझ्याकडे यावं, असा तिचा हट्ट असायचा. मला नाटकात काम करताना पाहून तिला आनंद व्हायचा..
इतरांना देत राहावं, दिवाळीमध्ये गिफ्ट घेण्याऐवजी इतरांना गिफ्ट द्याव्या हे तिच्यातले गुण माझ्यात आहेत. आईच्या हातची
शेवयाची खिर चविष्ट असायची. त्याची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. मराठवाड्या धपाटे व्हायचे. म्हणजे हुरडा खाल्यानंतर जे शिल्लक राहत त्याच्या घुग-या करतात. ते नंतर मिस्करमध्ये काढून आई धपाटे करायची. त्याच्याबरोबर भरलेली मिरची, दही असा तिचा स्वयंपाक असायचा. पुरणपोळीची चव भारी असायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती शिक्षिका असल्यामुळे सकाळी दहाची शाळा असायची पण सकाळी आम्हाला नाश्ता करून द्यायची. त्यांनतर दुपारी दीडची सुट्टी असायची. पण ती सव्वा वाजता शाळेत सांगून घरी यायची. गरम गरम स्वयंपाक आम्हा तिन भावंडांना, बहिणीला आणि बाबांना द्यायची. हे तिचे कष्ट लक्षात राहण्यासारखे आहे. माहेरचं पण ती सगळ्यांचं करायची. मामाला मदत करणं. त्यांच्या मुलांची शिक्षण, त्यांना वह्या पुस्तक देणं हे तेव्हापासून आमच्यातही आलं आहे इतरांना सतत मदत करणं.. कष्ट कष्ट आणि कष्ट. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. हा गुण तिच्याकडून माझ्यात आला आणि म्हणून कुठलंही बॅकग्राऊंड नसताना आम्ही या क्षेत्रात आलो आणि स्वत:च्या हिमतीवर उभा राहिलो. प्रयत्न करत राहणं आणि कष्ट करत राहणं मग यश मिळेल. हे ती सतत सांगायची. ती नेहमी म्हणायची तुझी धावपळ मला दिसते. पण प्रकृतीकडे लक्ष दे. शिक्षिका म्हटलं की, कडक शिस्तीचे असतात. पण माझी आई प्रेमळ शिक्षिका होती. तिने कधी मुलांना मारलं नाही. कधी छडी हातात घेतली नाही आणि अजूनही तिचे विद्यार्थी भेटले की, महाबोले बाईंचं म्हणजे माझ्या आईचं नाव घेतात. प्रेमाणे कसं जग जिंकता येतं ते दाखवून दिलं.
माझ्या आईचा माझ्यावर खूपच जीव आहे. पण ती खूप व्यक्त होतं नाही. म्हणजे तिच्या मनात माझ्याबद्दल काय सुरू असतं, ते ती कधीच बोलून दाखवत नाही. जेव्हा पण मी नागपूरहून मुंबईला निघतो तेव्हा ती कधीच व्यक्त होतं नाही. तिच्या डोळ्यात बरचं काही असतं पण ती कधीच व्यक्त होतं नाही. फक्त तिच्या डोळ्यातला आनंद ओसंडून वाहत असतो. तिथे गेल्यावर माझ्यासाठी मेजवानी असते. आई कधीच माझ्यावर रागवत नाही. तिला कधी वाईट वाटलं तर ती बोलून दाखवते, पण माझ्यावर कधी ती रागावली नाही. ती कधीच मला ओरडली नाही. बाबा रागवतात. पण आई नाही. ती नेहमीच माझ्यासाठी ढाल होती.
जेव्हा मी मुंबईला अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं. तेव्हा बाबांशी हे सगळे शेअर करणं माझ्यासाठी कठिण होतं. कारण मी त्यांना घाबरतो. पण आई माझ्यासाठी नेहमीच सपोर्ट सिस्टिम होती. त्यामुळे तिच्या पाठिंब्यामुळेच मी आज कलाक्षेत्रात नाव कमवतो आहे. तसंच स्कूलमध्ये पिकनिकला जायचं असेल तर मी आईला मस्का लावायचो. कारण मी अभ्यासात कच्चा होतो. त्यामुळे बाबांचा फार विरोध असायचा. मग आई बाबांकडून मला परवानगी घेऊन द्यायची. कधी मित्रांमध्ये फिल्म बघायला जाण्यासाठी पैसे हवे असतील तर आईच द्यायची.
पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेत अहिल्याबाईची भूमिका करणारी अभिनेत्री ऐतशा संझगिरी आईच्या अगदी जवळची आहे. त्यामुळे आईबद्दल ती भरभरून बोलते. “अगदी पहिल्यापासून आई हा माझ्या मुख्य आधार आहे. माझ्या यशामागे तीच आहे, तिने नेहमीच माझी आणि माझ्या स्वप्नांची काळजी घेतली आहे.
मी बर्याचदा शूटिंगमध्ये गुंतलेली असते. त्यामुळे, कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकत नाही. या मदर्स डे च्या निमित्ताने मात्र मी त्यात बदल करणार आहे. मी आईबरोबर बाहेर जाणार आहे आणि तिला मस्त जेवणाची ट्रीट देणार आहे. मग आम्ही मॉलमध्ये फेरफटका मारू आणि शेवटी मस्त स्पा मध्ये रिलॅक्स होऊ. तिने माझ्यासाठी जे काही केले आहे. त्यानंतर मी कमीतकमी इतके तर केलेच पाहिजे. आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मी मदर्स डेच्या शुभेच्छा देते.”
माझी आई बँकेत नोकरी करायची. पण तसं जरी असले तरी ती घरात गृहिणी म्हणून किंवा आई म्हणून कधीच कमी पडली नाही. ती सगळे पदार्थ बनवायची. ती पुण्याची जरी असली तरी मुंबईच्या मैत्रिणीकडून तिने व्हेज- नॉन व्हेज असे वेगवेगळे पदार्थ शिकून घेतले.
सगळे पदार्थ घरी बनवायला आणि बनवून खायला घालायला तिला फार आवडायचे. त्यामुळे आठ तास नोकरी केल्यानंतर बायका जेव्हा म्हणतात की, मी आता थकले ऑनलाईन ऑर्डर करूयात. मला ते पटत नाही. कारण माझी आई हँडिकॅप असूनही सार काही करायची. ३६ वर्षे नोकरी करून ती घरातलं सगळं करायची.
[read_also content=”झुक्याभाऊंच असं झालंय! फेसबुकच्या मालकाची सुरू झालीये उतरण, ३ऱ्या पासून ते १८ व्या क्रमांकपर्यंतचा प्रवास; जाणून घ्या नेमकं कारण https://www.navarashtra.com/business/the-rise-and-fall-of-mark-zuckerberg-facebook-owners-descent-journey-richest-person-from-3rd-to-18th-find-out-the-exact-reason-nrvb-276355/”]
तिचं टाईम मॅनेजमेंट चांगलं होतं. टाईम मॅनेजमेंट मी तिच्याकडून शिकलो.. तसच आई माझी पहिली गुरू. गाणं मी तिच्याकडून शिकलो. आई छान अभिनेत्रीपण होती. तिचे स्टेजवर काम करतानाचे फोटो आहेत. आईला जाऊन एक वर्षे झालं. पण तिचं स्मरण नेहमीच होतं.