फोटो सौजन्य: Zee Studios YouTube
Dashavatar Marathi Movie: कोकण म्हंटल की अनेकांच्या नजरेसमोर सुंदर आणि शांत समुद्रकिनारे, छान कौलारू आणि चिरेबंदी घरं, शिमगा आणि इतर निसर्गरम्य ठिकाणं आठवत असतात. मात्र, या सर्वात कोकण अजून एका गोष्टीसाठी लोकप्रिय आहे. ती गोष्ट दशावतार नाट्य.
आजवर मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषयांवरील दर्जेदार चित्रपट आलीत. कोकणातील विविध विषयांवर देखील चित्रपट मराठी मातीत येऊन गेले. आता त्यात अजून एका चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट म्हणजे सुबोध खानोलकर लिखित आणि दिग्दर्शित दशावतार!
जेष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दशावतार या त्यांच्या आगामी चित्रपटात सुद्धा ते एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील पाहिलं गाणं ‘आवशीचो घो’ सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालं.
महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न
जेव्हापासून दशावतार चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते, तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत होती. यानंतर चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झालं आणि समजले की यात दिलीप प्रभावळकारांसोबत महेश मांजरेकर, विजय केंकरे, सुनील तावडे, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे आणि प्रियदर्शनी इंदलकर झळकणार आहे. नुकतंच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाच्या नावावरून वाटले होते की हा चित्रपट कोकणच्या मातीशी नाळ जोडणारा असेल. मात्र, चित्रपटाचा ट्रेलर पाहता हा नक्कीच एक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट असण्याची शक्यता आहे. हा चित्रपट येत्या 12 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओश आर्ट हाऊस निर्मित हा सिनेमा आहे.