Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मना’चे श्लोक’चे भन्नाट पोस्टर प्रदर्शित, दोघांचं नेमकं नातं काय ?

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मना’चे श्लोक’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 01, 2025 | 05:11 PM
‘मना’चे श्लोक’चे भन्नाट पोस्टर प्रदर्शित, दोघांचं नेमकं नातं काय ?

‘मना’चे श्लोक’चे भन्नाट पोस्टर प्रदर्शित, दोघांचं नेमकं नातं काय ?

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मना’चे श्लोक’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम देत नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या चित्रपटाचे पोस्टर पाहून ‘मना’चा श्लोक कोण आहे, याचा अंदाज येतोय. दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप काही सांगत आहेत. आता दोघांचं नातं नक्की काय आहे? लग्न, नातं यांबद्दल त्यांचे विचार काय आहेत, का मतभेद आहेत, हे पाहायला आता प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

चित्रपटात मृण्मयी आणि राहुलसोबत पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे कलाकारही झळकणार आहेत.

गर्ल गँग पुन्हा परतणार, ‘Four More Shots Please’ च्या शेवटच्या सीझनची घोषणा; पोस्टर रिलीज

 

चित्रपटाची दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे सांगते, “ ‘मना’चे श्लोक ही गोष्ट आहे मनवा आणि श्लोक या दोघांची. त्यांच्या नात्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या असण्यातून, त्यांची आयुष्याबद्दलची मतं, वेगवेगळे विचार हे सगळ्यांना ओळखीचे वाटतील. लग्नासारख्या विषयावर प्रत्येकाचं काही ना काही मत असतं. कुणाचं ठाम, कुणाचं गोंधळलेलं. या गोष्टी अनेकांनी अनुभवलेल्या असतील तर कोणी अनुभवेल. मी आताच सांगणार नाही की, चित्रपट कोणत्या वळणावर जाईल, परंतु मला खात्री आहे की प्रेक्षक मनातल्या मनात हसतील आणि म्हणतील, ‘हे तर अगदी माझ्यासारखं आहे!’ म्हणूनच हे ‘मना’चे श्लोक म्हणजे तुमच्याच मनातले विचार आहेत.”

अण्णा, आदित्य, बबली की सनी; ५ करोड रुपयांचा खेळ कोण जिंकणार? ‘येरे येरे पैसा ३’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

चित्रपटाचे निर्माते संजय दावरा म्हणतात, “मराठीत पहिल्यांदाच पाऊल टाकतोय. ‘मना’चे श्लोक’सारख्या संकल्पनेतून सुरुवात होणं माझ्यासाठी खास आहे.”

सह-निर्माते श्रेयश जाधव सांगतात, “हा चित्रपट एक वेगळी झलक घेऊन येतोय. मृण्मयीचं दिग्दर्शन आणि ती ज्या पद्धतीने गोष्टी टिपते, त्यातून प्रेक्षक नक्की रिलेट होतील.”

गणराज स्टुडिओ आणि संजय दावरा एक्सपरिअन्स निर्मित, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून, हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Mrunmayee deshpande and rahul pethe marathi movie manache shlok poster released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Mugdha Godbole: मुग्धा गोडबोलेंच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; लिहिली भावुक पोस्ट
1

Mugdha Godbole: मुग्धा गोडबोलेंच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; लिहिली भावुक पोस्ट

Jyoti Chandekar Death Anniversary: “आई, १ वर्ष झालं तुझ्याशिवाय…”; ज्योती चांदेकरांच्या स्मृतीदिनी तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट
2

Jyoti Chandekar Death Anniversary: “आई, १ वर्ष झालं तुझ्याशिवाय…”; ज्योती चांदेकरांच्या स्मृतीदिनी तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट

Manjar Marathi Movie: ‘मांजर’ नेमकं कोण? तीन मित्रांच्या गोंधळाची भन्नाट गोष्ट; ‘या’ दिवशी होणार रहस्याचा उलगडा
3

Manjar Marathi Movie: ‘मांजर’ नेमकं कोण? तीन मित्रांच्या गोंधळाची भन्नाट गोष्ट; ‘या’ दिवशी होणार रहस्याचा उलगडा

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक
4

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.