(फोटो सौजन्य - x अकाउंट)
जर तुम्हीही प्राइम व्हिडिओच्या लोकप्रिय मालिका ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ चे चाहते असाल, तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर अली आहे. कारण आता या शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जो मालिकेचा शेवटचा सीझन देखील असण्याची शक्यता आहे. प्राइम व्हिडिओने मालिकेच्या चौथ्या सीझनची घोषणा करून चाहत्यांना खुश केले आहे. यासोबतच त्याचे एक नवीन पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे. जे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
शेवटच्या सीझनमध्ये ही कथा संपेल
प्राइम व्हिडिओने शेवटच्या सीझनचे पोस्टर रिलीज केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “शेवटच्या सीझनसाठी तुमचे शॉट्स तयार ठेवा.” ही मालिका आजच्या महिलांच्या जीवनातील चढ-उतार दाखवते. सीझन ४ मध्ये, शोच्या प्रमुख अभिनेत्री, दामिनी, अंजना, सिद्दी आणि उमंग शिकणार आहेत की त्यांना दुसऱ्या कोणाचेही नंबर वन बनण्याची गरज नाही, तर त्या स्वतःच्या जीवनाच्या हिरो आहेत. कारण आनंद ही लक्झरी नाही तर जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. हे सगळं या मालिकेतून दिसून येणार आहे.
यावेळी शोमध्ये काही नवीन चेहरे दिसतील
यावेळी काही नवीन चेहरे देखील या शो मध्ये दिसणार आहेत तसेच प्रसिद्ध मुलींच्या सहली आहेत. शेवटच्या सीझनच्या कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, सयानी गुप्ता, कीर्ती कुल्हारी, बानी जे आणि मानवी गगरू यासारख्या मुख्य पात्रांसह, लिसा रे, प्रतीक बब्बर, राजीव सिद्धार्थ, अंकुर राठी आणि मिलिंद सोमण हे कलाकार देखील दिसतील. अरुणिमा शर्मा आणि नेहा पार्टी मतियानी दिग्दर्शित, या सीझनचे लेखन देविका भगत यांनी केले आहे. त्याचे संवाद इशिता मोईत्रा यांनी लिहिले आहेत. तथापि, चौथ्या सीझनची रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.