‘नाच बेबी’ या गाण्याचा टीझर रिलीज, पहा सनी लिओन आणि रेमो डिसूझा यांच्या जबरदस्त डान्स मूव्ह्स
अभिनेत्री सनी लिओनी आणि रेमो डिसूझा यांच्या 'नाच बेबी' या नव्या गाण्याचा टीझर रिलीज झालायं. ज्यामध्ये स्टार्स शानदार लूकमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसतायेत. हे गाणं भूमी त्रिवेदी आणि विपिन पटवा यांनी संगीतबद्ध केलं असून त्यांचा आवाज आणि गीत कुमार यांनी लिहिली आहेत आणि हितेंद्र कपोपारा, पियुष जैन आणि मीत अहिर यांनी निर्मिती केलीये. मात्र, या गाण्याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणारे. हे संपूर्ण गाणं 6 सप्टेंबरला रिलीज होणारे. सनी लिओनीने तिच्या इंस्टाग्रामवर या गाण्याचा टीझर शेअर केलायं. जो चाहत्यांना खूप आवडला. आतापर्यंत 27 हजारांहून अधिक लोकांनी या टीझरला लाईक केलयं.