कवियत्री संजीवनी बोकील यांची ही कविता अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभूलकर यांनी तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत मधुराणी अरुंधतीची प्रमुख भूमिका साकारत आहेे. मधुराणी तिच्या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करते कधी या मालिकेचे किंवा कधी खाजगी जिवनातील आणि आता मधुराणीने ही कविता शेअर केल्यावर तिच्या फॅन्सनी तिला मनापासून दाद दिली आहे. मधुराणी ही अभिनेत्री तर उत्तम आहेच पण तिच्यात गायिकापण आहे. आणि आता ही कविता सादर करून मधुराणीने तिचं कवीमन प्रेक्षकांसमोर उलगडलं आहे.
मधुराणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तिला भरभरून दाद दिली आहे. खूपच मस्त, अप्रतिम मधुजी अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. ही कविता अरूंधतीसाठी लिहिली आहे का? असा प्रश्न ही कविता ऐकून चाहत्यांना पडला आहे.