मॅाडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेनं (Poonam Panday) काही दिवसापुर्वी स्व:तच्या मृत्यूचा रचलेला बनाव (Poonam Pandey Fake Death) आता उघड झाला आहे. याबद्दल तिनं स्वताच सांगितलं. हे मृत्यूकांड तिला महागातही पडलं आहे. तिच्या विरुध्द अनेक तक्रारीही करण्यात आल्या. आता तरी ही बया शांत बसली असं वाटत असताना आता तिच्या डोक्यात पुन्हा काहीतरी शिजत असल्याचं दिसत आहे. पुनमनं तिच्या इन्टाग्रामवरील सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यामुळे ही पुन्हा ही ड्रामा क्विन नवं काय करणार, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
[read_also content=”पूनम पांडेच्या मृत्यूच्या नाटकात सामील एजन्सीनं मागितली माफी, जारी केलं निवेदन! https://www.navarashtra.com/movies/the-agency-involved-in-poonam-pandey-fake-death-news-stuts-apologies-nrps-504661.html”]
पूनम पांडेनं इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे, सत्य लवकरच समोर येईल. यासोबतच तिनं गेल्या काही दिवसांत सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील सगळ्या पोस्टही डिलीट केल्या आहेत.
पूनम पांडेन केलेली नवी पोस्ट नेटकऱ्यांच्या पचनी पडत नाही आहे. त्यांनी तिला सांगलच सुनावलं आहे. आता ही पुन्हा काय नवं करणार आहे का असं प्रश्न तिला विचारण्यात येत आहे. तर, काहींनी तिला ट्रोल करत म्हण्टलं, आता आम्ही कोणतीही फेक न्यूज ऐकू शकत नाही. आता आमचा हिच्यावर अजिबात विश्वास नाही. आता बोलेल माझं खरचं निधन झालं आहे, आता अजून काही बाकी आहे का? अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
काही दिवसापूर्वी पूनम पांडेचं निधन झाल्याचं सांगण्यात येत होतं. या बातमीनं फॅन्ससह सेलेब्रिटिंनीही मोठा धक्का बसला होता. त्यांनतर पूनमनं जीवंत असल्याचं स्वत: सांगितल. मृत्यूची खोटी बातमी दिली म्हणून सोशल मीडियावर लोकांनी पूनमला चांगलच सुनावलं, पूनमसह तिच्या मृत्यूच्या नाटकात सामील असलेल्या एजन्सीवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानतंर सोशल मीडियावरली लोकांचा वाढता रोष पाहून आता पूनमच्या मृत्यूच्या नाटकात तिला पाठिंबा देणाऱ्या एजन्सीनं लोकांची माफी मागितली.