Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग; मनोरंजन आणि मस्तीचा चाहत्यांना मिळणार जबरदस्त पॅकेज

‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आता मात्र ‘खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग’ असं म्हणत प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर यांच्या दोस्तीची दुनियादारी पहायला मिळणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 03, 2025 | 05:41 PM
ATM चोरीचा आरोप, घोटाळ्यांची रेलचेल अन् तीन गुंडांची एन्ट्री; 'ऑल इज वेल'चा कॉमेडी ट्रेलर एकदा बघाच

ATM चोरीचा आरोप, घोटाळ्यांची रेलचेल अन् तीन गुंडांची एन्ट्री; 'ऑल इज वेल'चा कॉमेडी ट्रेलर एकदा बघाच

Follow Us
Follow Us:

‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आता मात्र ‘खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग’ असं म्हणत प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर यांच्या दोस्तीची दुनियादारी पहायला मिळणार आहे. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या आगामी ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटात अमर, अकबर आणि अँथनी नावाच्या तीन मित्रांच्या मैत्रीची धमाल गोष्ट पहायला मिळणार आहे.

मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Vibhu Raghave च्या अंत्यसंस्काराला कलाकारांची हजेरी, मोहित मलिकसह अनेक सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर हे जबरदस्त त्रिकुट ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले असून तिघांसोबत या चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

पोटापाण्याच्या शोधात मुंबईत आलेल्या अमर,अकबर आणि अँथनी या तिघांच्या आयुष्यात एका अनपेक्षित घटनेने कशी खळबळ उडते? याची धमाल गोष्ट ‘ऑल इज वेल’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. आणि ही उलथापालथ निस्तरताना त्यांची मैत्री कशी खुलते, हे मजेशीर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक योगेश जाधव यांनी या चित्रपटा मधून केला आहे.

 

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळणार महावटपौर्णिमा, वडाच्या रक्षणासाठी नायिका उठवणार आवाज

चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. पटकथा, संवाद प्रियदर्शन जाधव यांनी लिहिले आहेत. संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा कीर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी ‘ऑल इज वेल’ चित्रपटातील गाणी गायली आहेत.

प्रियदर्शन, अभिनय, रोहित हे जबरदस्त त्रिकुट २७ जूनला ‘ऑल इज वेल’ म्हणत चित्रपटगृहात धुडगूस घालायला सज्ज होत आहेत.

Web Title: Pridarshan jadhav abhinay berde rohit haldikar starrer all is well marathi movie poster released on social declared released date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi film
  • Marathi Film Industry
  • marathi movie
  • Priyadarshan Jadhav

संबंधित बातम्या

Manjar Marathi Movie: ‘मांजर’ नेमकं कोण? तीन मित्रांच्या गोंधळाची भन्नाट गोष्ट; ‘या’ दिवशी होणार रहस्याचा उलगडा
1

Manjar Marathi Movie: ‘मांजर’ नेमकं कोण? तीन मित्रांच्या गोंधळाची भन्नाट गोष्ट; ‘या’ दिवशी होणार रहस्याचा उलगडा

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
2

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
3

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज
4

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.