पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येमागील कारण आता समोर आले आहे. मानसाचे एसएसपी गौरव तुरा यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे कोणाचा हात आहे याबाबत मोठा खुलासा केला आहे. कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे गौरव तुरा यांनी म्हटले आहे.
मुसेवाला यांनी बुलेटप्रुफ गाडी घेतली नव्हती, शिवाय त्यांच्यासोबत आज त्यांचा अंगरक्षक देखील नव्हता. याचाच फायदा घेत त्यांच्यावर 9 एमएम पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. मुसेवाला यांच्यावर गोलीबार झाला त्यावेळी सिद्धू मुसेवाला हे स्वतः गाडी चालवत होते. लॉरेन्स बिश्नोई आणि लकी पटियाल यांच्यातील टोळीयुद्धामुळे मूसवाला यांची हत्या करण्यात आलीची माहिती पोलिसांनी दिली असून लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी गोल्डी ब्रार याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.