आतापर्यंत सर्वांना समजले आहे की, अंबानींच्या घरात पुन्हा शेहनाईंचा सूर वाजू लागला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणजेच अंबानींच्या धाकट्या मुलाच्या लग्नाच्या कार्यक्रमांना आता सुरुवात झाली आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच त्याची दीर्घकाळाची मैत्रीण राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
अनंत-राधिका यांच्या लगीनसराई आता सुरु झाली आहे. नुकतेच त्यांच्या लग्नाचे कार्डहवी समोर आले, ज्यात प्री-वेडिंग फंक्शनची सर्व माहिती देण्यात आली आहे. आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरची सून राधिका मर्चंट नक्की कोण आहे? तिचे वडील काय करतात? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुकेश अंबानींचे व्याही नक्की कोण आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती सांगत आहोत.
अनंत अंबानीची होणारी पत्नी राधिका ही भारतीय करोडपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंटचे वडील वीरेन मर्चंट यांचे नाव देशातील करोडपतींच्या यादीत समाविष्ट आहे. ते हेल्थकेअर कंपनी एंकोरचे सीईओ आहेत. याशिवाय वीरेन मर्चंट भारतीय बाजारपेठेतील अनेक मोठ्या कंपन्याना मॅनेज करतात. यामध्ये ‘एनकोर बिझनेस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड’, ‘एनकोर नॅचरल पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘झेडवायजी फार्मा प्रायव्हेट लिमिटेड’, ‘साईदर्शन बिझनेस सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एनकोर पॉलीफ्रॅक प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. आता त्यांच्या नेटवर्थबद्दल बोलणे केले तर DNA च्या रिपोर्टनुसार, वीरेन मर्चंट जवळपास 755 कोटी रुपयांचा मालक आहेत.
आता राधिकाच्या एकूण नेटवर्थबद्दल बोलणे केले तर, याची अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही. मात्र एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण नेटवर्थ 8-10 करोडोंच्या जवळपास आहे. तुम्हाला सांगतो, राधिकाला नृत्याची फार आवड आहे. ती एक उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना आहे. यांनतर आता अनंत अंबानींच्या एकूण नेटवर्थबद्दल बोलणे केले तर DNA च्या अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती 3,44,000 कोटी रुपये आहे.
अनंत-राधिकाची लव्हस्टोरीबद्दल सांगायचे झाले तर, दोघेही कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होते आणि नंतर ते एकमेकांना डेट करू लागले. राधिका याआधीही अंबानींच्या अनेक फंक्शन्समध्ये दिसून आली आहे. राधिका आणि अनंत यांची गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एंगेजमेंट झाली होती, ज्यामध्ये फिल्मी जगतातील सर्व स्टार्स सहभागी झाले होते.