अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने (Rakul Preet Singh) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी रकुल खूप मेहनत घेत असते. रकुलच्या एका आगामी चित्रपटाचं शूटींग सुरु आहे. या चित्रपटासाठीही ती खूप कष्ट घेताना दिसत आहे. तिने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टमधून तिने शूटींगसाठी केलेल्या एका वेगळ्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. चित्रपटाच्या शूटींगसाठी तब्बल ११ तास (11 Hours Shooting In Water) सलग रकुल पाण्यात होती.
रकुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतीच एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीमध्ये ती भिजलेली दिसत असून टॉवेल गुंडाळून ती काढा पिताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “मी हे आतापर्यंत केलेलं सर्वात कठीण शूटिंग आहे. सलग ११ तास मी पाण्यात शूटिंग करत आहे. या पाण्यातल्या शूटींगमुळे वाजणारी थंडी ही माझ्यासाठी खूप समाधानकारक आहे. यात मला हा काढा ऊब देण्याचं काम करतोय.”
या पोस्टनंतर रकुलच्या डेडिकेशनचं आणि धाडसाचं चाहते कौतुक करत आहेत. इतके तास पाण्यात राहणं काही सोपं नाही. पण एक कठीण काम रकुलने सहज पूर्ण केलं आहे.