मंगळवारला जोडप्यांचा वेगळा होण्याचा दिवस म्हणता येईल. ऐश्वर्या-धनुष आणि नितीश भारद्वाज यांच्यानंतर आता साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीची धाकटी मुलगी श्रीजाही पती कल्याण धेवपासून विभक्त झाल्याच्या बातम्या येत आहेत. एका दिवसातील हे तिसरे सेलिब्रिटी कुटुंब आहे जे आता वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत. श्रीजाच्या इन्स्टाग्राम हँडलवर बदललेल्या नावामुळे ती पती कल्याणपासून वेगळे होण्याच्या अफवांना उधाण आले आहे. मात्र, या दोघांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
6 वर्षांपूर्वी झाला होता श्रीजा-कल्याणचा विवाह.
श्रीजाने मार्च 2016 मध्ये कल्याणसोबत बेंगळुरूजवळील कुटुंबाच्या फार्महाऊसवर लग्न केले. लग्नाला नातेवाईक, जवळचे मित्र आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्सनी हजेरी लावली होती. या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले होते. कल्याण आधी श्रीजाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आधी पतिच कल्याणचं नाव होतं आता तिने ते काढून वडिलांचे आडनाव कोनिडेला जोडले आहे. जेव्हापासून ही गोष्ट समोर आली आहे, तेव्हापासून या दोघांमध्ये काय चालले आहे याची इंटरनेटवर बरीच चर्चा होत आहे.
हुंड्याच्या कारणावरून पहिल्या पतीपासून घेतला घटस्फोट
कल्याणपूर्वी श्रीजाचं लग्न सिरीष भारद्वाजसोबत झाला होता. महाविद्यालयीन मित्र आणि प्रियकराशी असलेल्या सिरीषसोबत तिचे लग्न झाले तेव्हा ती 19 वर्षांची होती. नंतर, तिचे सासरचे लोक हुंड्याची मागणी करत असल्याचा दावा करत तिने त्याच्यापासून वेगळे झाले. श्रीजाने तिच्याविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला होता आणि 2011 मध्ये सिरिशपासून कायदेशीररित्या वेगळे झाले होते. तिला एक मुलगीही आहे.