जागतिक प्रवासात भारतीय तरुणांची आघाडी: प्रवास आता फक्त सुट्टीसाठीच नाही तर बनला ‘लाइफस्टाइल’चा भाग ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Indian Youth Exploring World : जग किती सुंदर आहे, हे एका प्रवासी तत्त्वज्ञाने सांगितले होते “घरातून बाहेर पडा, जग स्वतः तुम्हाला आपली जादू दाखवेल.” आजच्या भारतीय तरुणाईकडे (Indian youth) पाहिल्यावर हे अगदी तंतोतंत खरे वाटते. कामाच्या ताणातून, अभ्यासातून किंवा दैनंदिन धकाधकीतून सुट्टी घेत, स्वतःच्या जगाचा शोध घेण्यासाठी भारतीय तरुण आता वेगाने परदेश भ्रमंतीकडे वळत आहेत. पर्यटन मंत्रालयाने जाहीर केलेली ताजी आकडेवारी तरुणांच्या या ‘ट्रॅव्हल क्रेझ’(Travel Craze) चा जिवंत पुरावा आहे. भारतातून परदेशात जाणाऱ्या एकूण प्रवाशांमध्ये १५ ते ४४ वयोगटातील प्रवासी ६०% हून अधिक आहेत, जग एक्सप्लोर करण्याच्या या स्पर्धेत भारतीय तरुण खऱ्या अर्थाने आघाडीवर आहेत.
पर्यटन मंत्रालयानुसार:
या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसते की प्रवास आता भारतीय तरुणांसाठी ‘शुक्रवारी सुट्टी आणि रविवारी परत’ हा साधा प्लॅन नाही—तो आता जीवनशैलीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा हिस्सा बनला आहे. मर्यादित बजेट, कमी वेळ आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या असूनही तरुणाई परदेश प्रवासाचे नियोजन करते, नवे देश पाहते आणि त्या संस्कृती काही दिवसांतच समजून घेण्याचा प्रयत्न करते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Immortal Jellyfish : ‘हा’ समुद्री जीव म्हणजे चक्क मृत्यूला आव्हान देणारा महासागरातील चमत्कार अन् एकमेव ‘बायोलॉजिकल रीसेट बटण’
या उलट, भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांचा ट्रेंड एकदम वेगळा आहे:
भारतीय तरुणांच्या तुलनेत त्यांची प्रवासी मानसिकता ‘अनुभव हळूहळू घेण्याची’ असते, तर भारतीय तरुणांचा प्रवास एक्सप्लोरेशनचा धडाका असतो. पर्यटन तज्ज्ञांच्या मते, भारतीयांसाठी प्रवास आता स्टेटस सिम्बॉलपेक्षा ‘अनुभवांची गुंतवणूक’ बनला आहे—फोटो नाही, तर अनुभव जपण्याची नवीन पिढी उदयाला आली आहे.
मंत्रालयाने आणखी एक महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली आहे:
ही वाढ दर्शवते की भारत आता केवळ प्रवासी पाठवणारा देश नसून, जगभरातील पर्यटकांसाठी एक आकर्षक ‘टुरिस्ट हॉटस्पॉट’ बनत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Southern Spear: अमेरिका-व्हेनेझुएला संघर्ष उंबरठ्यावर? ट्रम्प यांनी उचलेल ‘असे’ अत्यंत निर्णायक पाऊल
आजचा भारतीय तरुण:
हे सगळं एकत्र येऊन ‘इंडियन ग्लोबल ट्रॅव्हल वेव्ह’ तयार करत आहे. प्रवास आता आनंदाचा स्रोत, अनुभवांचा खजिना आणि स्वतःला ओळखण्याचा मार्ग बनला आहे.






