‘इश्क विश्क रिबाउंड’ मधल नवीन गाण ‘गोर गोर मुखडे पे’ रिलीज झाल असून हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही. या गाण्यात सदाबहार स्टायलिश रोहित सराफ दिसणार आहे. त्यांच्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतो आहे. जिब्रान खान, पश्मिना रोशन आणि नाइला ग्रेवाल यांच्यासोबत उदित नारायण, बादशाह आणि निकिता गांधी यांच्या गायनाने आणि स्वत: बादशाह यांनी लिहिलेल्या गीतांसह हा नवीन ट्रॅक नक्कीच कमाल ठरणार आहे.
टीझर रिलीज झाल्यापासून गाण्याच्या झलकने रोहितच्या चाहत्यांमध्ये आणि संगीत रसिकांमध्ये जोरदार चर्चा निर्माण केली होती. चाहत्यांना खात्री आहे की हा चित्रपट अभिनेताला बॉलिवूडचा पुढचा रोमँटिक हिरो म्हणून स्थापित करेल. टायटल ट्रॅक चाहत्यांना नॉस्टॅल्जिक ट्रिपवर घेऊन जाणार आहे.
याआधी या चित्रपटातील ‘सोनी सोनी’, ‘इश्क विश्क प्यार व्यार’ आणि ‘छोट दिल पे लागी’ या चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे आणि आता हि सगळी गाणी मोठ्या प्रमाणावर ट्रेंड केले जात आहे. आणि ‘गोरे गोरे मुखडे पे’ हा नवा ट्रॅक अजून एक रेकॉर्ड करणार का हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. ‘इश्क विश्क रिबाउंड’ हा चित्रपट २१ जून रोजी रिलीज होणार असून, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘इश्क विश्क रिबाउंड’ व्यतिरिक्त रोहित सराफ ‘मिसमॅच 3’ मध्ये ऋषी शेखावतची लाडकी व्यक्तिरेखा पुन्हा साकारणार आहे. तो सध्या धर्मा प्रॉडक्शनच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ साठी शूटिंग करत आहे, ज्यामध्ये तो वरुण धवन, जान्हवी कपूर आणि सान्या मल्होत्रासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.
[read_also content=”कियारा अडवाणीचा अप्रतिम अभिनय तुम्ही कदाचित चुकवला असेल, तर टाका या चित्रपटांवर नजर https://www.navarashtra.com/entertainment/if-you-might-have-missed-kiara-advani-amazing-performance-check-out-these-movies-547629/”]