एकेकाळी धर्मांधतेसाठी जगभर कुप्रसिद्ध असलेला इस्लामिक देश सौदी अरेबिया ( Saudi Arabia) मोहम्मद बिन सलमान अल यांच्या राजवटीत आपली प्रतिमा सुधारत आहे. सौदी अरेबिया अधिकृतपणे मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होत आहे. असे करणारा तो पहिला इस्लामिक देश ठरला आहे. 27 वर्षीय सुंदर मॉडेल रुमी अलकाहतानी देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. सौदी अरेबियासाठी हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल आहे. यापूर्वी अलीकडेच सौदी अरेबियाने गैर-मुस्लिम राजनयिकांना दारू खरेदी करण्याची परवानगी दिली होती. याशिवाय महिलांना सार्वजनिक ठिकाणी गाडी चालवण्याची आणि पुरुषांसोबत कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची परवानगी होती.
[read_also content=”मुंबईत अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा, बिग बॉस विजेता मुनावर फारुकी पोलिसांच्या ताब्यात! https://www.navarashtra.com/movies/mumbai-police-detains-comedian-munawar-faruqui-in-hookah-bar-raid-518159.html”]
27 वर्षीय मॉडेल रुमी अलकाहतानीने (Rumy Alqahtani) सोमवारी इंस्टाग्रामवर माहिती दिली की ती मिस युनिव्हर्स स्पर्धेत सौदी अरेबियाची पहिली सहभागी होणार आहे.रिपोर्टनुसार सौदी अरेबिया मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील रहिवासी असलेला रुमी आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सहभागी होण्यासाठी ओळखला जातो. काही आठवड्यांपूर्वी तिने मलेशिया येथे झालेल्या मिस अँड मिसेस ग्लोबल एशियन स्पर्धेत भाग घेतला होता. “जागतिक संस्कृतींबद्दल जाणून घेणे आणि सौदीची संस्कृती आणि वारसा जगासमोर आणणे हे माझे योगदान आहे,” असं रुमी अलकाहतानी म्हणाली. मिस सौदी अरेबियाचा किताब जिंकलेल्या रुमीनं मिस मिडल इस्ट (सौदी अरेबिया), मिस अरब वर्ल्ड पीस 2021 आणि मिस वुमन (सौदी अरेबिया) स्पर्धा देखील जिंकल्या आहेत.
पुराणमतवादासाठी प्रसिध्द असलेला सौदी अरेबिया सध्या ३८ वर्षीय क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली अनेक बदल बघत आहे. अरबी द्वीपकल्पातील सर्वात मोठा देश म्हणून, सौदी अरेबियाने ऐतिहासिकदृष्ट्या कठोर सामाजिक आणि धार्मिक नियंत्रणे राखली आहेत. मात्र, अलिकडच्या महिन्यांत कठोर निर्बंध शिथिल केले गेले आहेत.
सौदी अरेबियामध्ये होत असलेल्या या बदलांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. विशेषतः महिलांवरील निर्बंध हटवण्याबाबत. ज्यामध्ये त्यांना गाडी चालवण्याची, पुरुषांसोबत कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची आणि पुरुष पालकाशिवाय पासपोर्टसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, कठोर अल्कोहोल धोरणांसाठी प्रसिद्ध असलेल्या सौदी अरेबियाने अलीकडेच गैर-मुस्लिम राजनयिकांना दारू खरेदी करण्याची परवानगी दिली.