सैफ अली खान हल्ला प्रकरण; आरोपीच्या पोलीस कोठडीत 'इतक्या' दिवसांची वाढ; कोर्टाचा निर्णय
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास (३०) याला १९ जानेवारीला पोलिसांनी पोलीस कोठडी सुनावली होती. २४ जानेवारीपर्यंतही पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा कार्यकाळ संपल्यानंतर वांद्रे न्यायालयाने पुन्हा एकदा पाच दिवसांची पोलीस कोठडीची वाढ करण्यात आली आहे. वांद्रे न्यायालयाने आरोपीला २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! वंशज संभाजीराजे छत्रपतींनी घेतला ‘या’वर आक्षेप
२४ जानेवारीला आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला आणखी पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने पोलिसांनी आरोपीच्या कोठडीत मुदतवाढ हवी आहे का, याबद्दल विचारले. युक्तीवाद करताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपीचा टॉवेल आणि कपडे जप्त केले असून त्याचे बूट अद्याप सापडलेले नाहीत. मिळालेल्या सीसीटीव्हीची एफएसएलकडून फेस रेकग्निशन चाचणी घ्यावी लागेल. यासाठी आम्हाला ७ दिवसांच्या कोठडीची आवश्यकता आहे. यानंतर आरोपी आणि वकिल दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे. आरोपी आणि वकिल दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर वांद्रे न्यायालयाने आरोपीला २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
“तू लढ! बाकी तेरा आदमी…”; सिद्धार्थ चांदेकरची पत्नीसाठी खास पोस्ट, हेमंत ढोमेच्या कमेंटने वेधलं लक्ष
सैफवर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी घुसखोर असून त्याने मे २०२४ मध्ये बांगलादेश सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केला होता. मेघालयात प्रवेश केल्यानंतर त्याने एका दलालाला दहा हजार दिले होते. त्या दलालाने मोहम्मद शरीफुलला आसामपर्यंत आणल्यानंतर त्याला एक सिम कार्डही उपलब्ध करुन दिले. त्याच दलालाने मोहम्मद शरीफुलला कोलकात्याला जाण्याऱ्या बसमध्ये बसवून दिले. कोलकात्यात तीन दिवस राहिल्यानंतर आरोपीने मुंबईत जाण्यासाठी रेल्वे पकडली. मुंबईमध्ये मोहम्मद शरीफुलने पुढचे तीन दिवस इकडे तिकडे भटकून काढले. त्यानंतर त्याची ओळख जितेंद्र पांडेसोबत झाली.
Kanchana 4: ‘कंचना’च्या चौथ्या भागात दिसणार बॉलिवूड अभिनेत्री, चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका!
जितेंद्र पांडेने त्याला वरळीतील एका पबमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून नोकरी लावली. मात्र ऑगस्ट २०२४ मध्ये काही दिवसातच चोरीच्या आरोपाखाली त्याला काढून टाकण्यात आले. नोकरी गमावल्यानंतर शरीफुलने चोऱ्या करण्यास सुरूवात केली. शरीफ ३१ डिसेंबरपासून खार आणि वांद्रेसारख्या उच्चभ्रू परिसरात फिरून आपले लक्ष्य शोधत होता. घरफोडी करण्यासाठी त्याने स्क्रू-ड्रायव्हर, हातोडा आणि हॅक्सॉ ब्लेड घेतले. ठाण्याच्या रेस्टॉरंटमधून चोरलेला चाकूही शरीफुल जवळ बाळगत होता, अशी माहिती त्याच्याकडून पोलिस चौकशीत मिळाली आहे.