(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
कंचना फ्रँचायझी लवकरच त्यांचा चौथा चित्रपट घेऊन येणार आहे. यावेळी कंचना ४ मध्ये दक्षिणेकडील नाही तर बॉलिवूड अभिनेत्री दिसणार आहेत. त्या अभिनेत्रींची नावे आणि त्यांच्या पात्रांबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. आतापर्यंत या चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. जे प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. आता चाहते या चित्रपटाच्या चौथ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
रॅपर Emiway Bantai अडकला लग्नबंधनात; पत्नीचा फोटो शेअर करून चाहत्यांना केले थक्क!
‘कंचना ४’ मध्ये बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रवेश
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘कंचना ४’ ची स्टारकास्ट फायनल झाली आहे. यावेळी चित्रपटात एक नाही तर दोन अभिनेत्री दिसणार आहेत. त्या दोघीही बॉलिवूड अभिनेत्री आहेत. लोकप्रिय कंचना फ्रँचायझीच्या चौथ्या भागात पूजा हेगडे मुख्य महिला भूमिकेत दिसणार आहे. पूजा चित्रपटात अशी भूमिका साकारते जी चित्रपटाच्या कथेवर अनपेक्षितपणे परिणाम करते. पटकथा ऐकल्यानंतर पूजाने लगेचच कांचना ४ करण्यास होकार दिला. या हॉरर कॉमेडी एंटरटेनरमध्ये पूजाच नाही तर बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट राघव लॉरेन्स दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपबाबत आता चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
कंचना फ्रँचायझी
मनीष शाह कंचना ४ ची निर्मिती करत आहेत. कंचना ४ हा चित्रपट ३१ मे २०२५ रोजी प्रदर्शित होऊ शकतो. कंचना ४ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या आठ आठवड्यांनी डिजिटल स्वरूपात प्रदर्शित होणार आहे. कंचना ही हिंदी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय असलेला चित्रपट आहे. बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारने ‘कंचना’चा हिंदीत ‘लक्ष्मी’ चित्रपटाचा रिमेक केला होता. जो हिंदी प्रेक्षकांना देखील आवडला होता.
सयाजी शिंदे २२ वर्षांनी पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी, नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
कधी होणार चित्रपट रिलीज?
चित्रपटाचे चित्रीकरण सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू झाले आहे. ‘कंचना ४’ २०२५ च्या उन्हाळ्यात प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. कंचना ४ हॉरर-कॉमेडी तमिळ भाषेतील चित्रपट ही एक हॉरर कथा असणार आहे. ज्याचा पहिला भाग २०११ मध्ये आला होता. आणि त्यानंतर या चित्रपटाचे २ भाग रिलीज झाले. आता त्याच्या चौथ्या भागात, राघव लॉरेन्स दिग्दर्शनासोबत अभिनयही करणार आहे. या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.