सौजन्य- सोशल मीडिया
अभिनेत्री समांथा रूथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी एकमेकांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या चार वर्षानंतर काही कारणास्तव त्यांच्यात दुरावा आला. दुरावा आल्यामुळे त्यांनी एकमेकांकडून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट झाल्यानंतर समांथा अनेक वर्ष सिंगलच होती. पण अभिनेता नागाचैतन्य एका प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत होता. नागाचैतन्यने आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाने काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर नुकताच त्यांचा साखरपुडा देखील पार पडला. शोभिताने आणि नागा चैतन्यचा साखरपुडा झाल्यानंतर अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
समांथा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. काही तासांपूर्वीच समांथाने इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. नागा चैतन्यने समांथासोबत गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर पहिल्यांदाच समांथा व्यक्त झाली आहे. पोस्टमध्ये ती म्हणते, “अनेक लोकांना असं वाटतं की, मैत्री आणि नाते या दोन्हीही संकल्पना एकमेकांवर अवलंबून आहे, पण मी या गोष्टीशी सहमत आहे. पण असं असलं तरीही, मला गेल्या काही वर्षांत एक गोष्ट जाणवली की, आपण प्रेमात असताना समोरच्या व्यक्तीला त्याची देण्याची कोणतीही तयारी नसताना आपण त्याला अनेक गोष्टी देऊन बसतो. ही गोष्ट तोपर्यंत सुरू असते, जोपर्यंत समोरची व्यक्ती ती गोष्ट परत देण्याच्या मन:स्थितीत नसतो तोपर्यंत.”
Instagram/ @samanthaprabhuoffl
पुढे पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, “प्रेम म्हणजे त्याग आहे. माझ्याकडे देण्यासाठी काहीही नसताना जे मला कायम देत राहिले, मी त्या लोकांचे कायमच आभारी आहे.” अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि अभिनेता नागाचैतन्य हे दोघेही एकमेकांना २०२२ पासून एकत्र डेट करीत आहेत. समांथासोबत घटस्फोट झाल्यानंतर नागाचैतन्य शोभिताला डेट करू लागला होता. दोघांचीही पहिली भेट २०२२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मेजर’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी झालेली होती. आधी फ्रेंडशिप झाली आणि मग एकमेकांमध्ये प्रेम खुलले. शोभिता आणि नागा चैतन्यने ८ ऑगस्टला गुपचूप साखरपुडा आटोपला. येत्या मार्च २०२५ ला हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे.