फोटो सौजन्य - #BiggBoss_Tak👁
बिग बॉस ओटीटी विजेता : बिग बॉस ओटीटी सिझन ३ चा काल फिनाले पार पडला यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सना मकबूल हिने बिग बॉस ओटीटी सिझन ३ ची ट्रॉफी नावांवर केली आहे. यंदाचा हा सिझनची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड झाली. यामध्ये अनेक खेळाडूंचे वाद गाजले तर अनेक खेळाडूंच्या मैत्रीची चर्चा पाहायला मिळाली. बिग बॉस ओटीटी सिझन ३ मध्ये टॉप ५ स्पर्धकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आणि फायनल पर्यत पोहोचवले. यामध्ये सना मकबूल, साई केतन राव, रणवीर शोरे, कृतिका मलिक आणि नेझी या स्पर्धकांना प्रेक्षकांनी सोशल मीडियावर भरभरून प्रेम दिले आहे शोमध्ये शेवटपर्यत टिकवून ठेवले..
The WINNING MOMENT of #SanaMakbul pic.twitter.com/buDmA3VFCD
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) August 2, 2024
या तिसऱ्या सीझनमध्ये सना मकबूल आणि नेझीची घट्ट मैत्री पाहायला मिळाली. यामध्ये बऱ्याच प्रेक्षकांना असे वाटत होते की सना मकबूल आणि नेझी यांचे प्रेम प्रकरण शोमध्ये पाहायला मिळेल परंतु त्यांनी त्याची मैत्रीने चाहत्यांची मनं जिंकली. त्याच्या या मैत्रीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.
रणवीर शौरी आणि सना मकबूल या दोघांचे शोमध्ये सुरुवातीपासूनच वाद पाहायला मिळाले. त्यामुळे या दोघांचे चाहते बऱ्याच वेळा सोशल मीडियावर सुद्धा वाद घालून आपल्या आवडत्या स्पर्धक कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असत. त्याचबरोबर सना मकबूलचे वाद कृतिका आणि साई केतन राव सोबत देखील पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर तिचे घरातील मित्र फार लवकर घराबाहेर झाले होते. एवढेच नव्हे तर सना मकबूल ही बिग बॉसच्या घरामध्ये चर्चेचा विषय असायची.
बिग बॉस ओटीटीचे जेतेपद सना मकबूल देण्यात आले आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर नेझी उपविजयी ठरला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रणवीर शौरी याचा नंबर लागला. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे कृतिका मलिक आणि साई केतन राव यांचा नंबर आला आहे.