(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री आणि ड्रामा क्वीन राखी सावंत दररोज बातम्यांमध्ये चर्चेत असते. ती काहीही करण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी जास्त विचार करत नाही. तिच्या या बेफिकीर वृत्तीमुळे ती बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर कायम राहते. अलिकडेच ती तिसरे लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. असं म्हटलं जात आहे की यावेळी राखी एका पाकिस्तानी अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे आणि ती लवकरच लग्न करणार आहे. राखीने स्वतः एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण हे जाणून घेणार आहोत.
राखी सावंतबद्दल असे वृत्त समोर आले आहे की अभिनेत्री आता पुन्हा लग्न करण्यास तयार आहे. या अभिनेत्रीने आता एका मुलाखतीत स्वतःच खुलासा केला आहे की, ती पाकिस्तानी अभिनेता-पोलिस अधिकारी दोदी खानशी लग्न करणार आहे. न्यूज १८ शी बोलताना राखीने तिच्या तिसऱ्या लग्नाबद्दल सांगितले. हे दोघंही एकमेकांवर प्रेम असल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे. राखी सावंतने पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की तिला दोदी आवडतो आणि लवकरच त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करत आहे. तसेच अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘तो माझा प्रियकर आहे.’ आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. तो पाकिस्तानचा आहे. मी भारतातून आहे, म्हणून आम्ही प्रेमविवाह करू.’ असे अभिनेत्रीने सांगितले आहे.
दोदी खान कोण आहे?
दोदी खान केवळ अभिनेता किंवा चित्रपट निर्माते नाहीत तर ते एक पोलिस अधिकारी देखील आहेत. अभिनयाव्यतिरिक्त, दोदी खानला त्याच्या फिटनेसची खूप आवड आहे. पाकिस्तानी अभिनेत्याने खुलासा केला होता की बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याचे प्रेरणास्थान आहे. आता याच अभिनेत्यासह अभिनेत्री राखी सावंत लग्नगाठ बांधणार आहे.
Thandel: यूट्यूबवर ट्रेंड करत आहे ‘थंडेल’चा ट्रेलर; नागा-साईच्या चित्रपटाला मिळाले एवढे व्ह्यूज!
राखीचे दोन्ही लग्न मोडले आहेत.
राखीने बिझनेसमन रितेश सिंगशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. २०२० मध्ये बिग बॉसच्या माध्यमातून या अभिनेत्रीने त्याला प्रेक्षकांसमोर आणले. त्यानंतर २०२२ मध्ये ते वेगळे झाले. यानंतर राखीच्या आयुष्यात आदिल खानने एन्ट्री केली. तिने आदिलशी लग्न करण्यासाठी तिचा धर्मही बदलला. नंतर, राखीने त्याच्यावर घरगुती हिंसाचार आणि फसवणुकीचा आरोप केला, त्यानंतर हे प्रकरण न्यायालयापर्येंत पोहचले. आणि आता अभिनेत्री तिसरे लग्न करणार आहे.