टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणातील आरोपी शीझानची चार दिवसांची कोठडी आज संपत आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आता पोलीस न्यायालयाकडे आरोपींच्या पुन्हा कोठडीची मागणी करतात का? याकडे आता सर्वांच लक्ष लागलयं. तसेच शीझानच्या वतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल होणार का हे पाहणं महत्त्वाच आहे.
[read_also content=”अश्लिल डान्स करणं आलं अंगलट! Gautami Patil चा कार्यक्रम पहिल्यांदाच रद्द, आयोजनास गावकऱ्यांचा नकार https://www.navarashtra.com/movies/gautami-patil-dance-show-in-nimgaon-ketaki-is-cancelled-nrps-357440.html”]
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाचा तपास सातत्याने सुरू आहे. पोलीस आता या संदर्भात शीजान आणि तुनिषाच्या आईचीही चौकशी करणार आहेत. दरम्यान, शीजनच्या मोबाईल रेकॉर्डवरून पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. व्हॉट्सअॅप चॅटवरून पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.
[read_also content=”असं काय झालं? रिलं केलं आणि ४८ तासांत २२ वर्षीय Socil Media Influncer लीना नागवंशीनं केली आत्महत्या? https://www.navarashtra.com/movies/what-happend-in-48-hours-as-leena-nagwanshi-attempted-suicide-nrps-357481.html”]
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानकडून रोज काही ना काही नवे खुलासे होत आहेत. तुनिषा आणि त्याचा तीन महिन्यांत ब्रेकअप झाल्याची माहिती त्याने दिली आहे. तर दोघांमध्ये वयामध्ये अंतर असल्याने आणि धर्म वेगळे असल्याने ब्रेकअप केल्याचं त्याने यापुर्वीही सांगितले आहे.