मुंबई : काही वेळापूर्वीच, मनोरंजन विश्वातून अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या केल्याची धक्काबायक बातमी समोर आली आहे. तिने मेकअप रूममध्ये गळफास लावून घेतला आणि हॉस्पिटलमध्ये ती मृतावस्थेत आढळली. तिने हे धक्कादायक पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नसले तरी एका नवीन अहवालात ती गरोदर असल्याचे समोर आले आहे.
E24 च्या रिपोर्टनुसार, तुनिशा शर्मा गर्भवती होती. तिला डिप्रेशनचाही त्रास होता. अहवालात असेही म्हटले आहे की तिच्या प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तो मुस्लिम असल्याचीही माहिती मिळते आहे. मात्र, तिच्या निकटवर्तीयांनी किंवा पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
तुनिशाने आत्महत्या करण्याच्या काही तास आधी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो पोस्ट केला होता. तिने लिहिले, “जे त्यांच्या पॅशनने प्रेरित आहेत ते थांबत नाहीत.” तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे जेव्हा ती शूटच्या आधी मेकअप करत होती.
[read_also content=”मालिकेच्या सेटवरच्या मेकअप रुममध्येच गळफास घेत आत्महत्या,अभिनेत्री टुनिशा शर्माच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीला धक्का https://www.navarashtra.com/entertainment/actress-tunisha-sharmas-suicide-attempt-at-make-up-room-of-serial-set-nrsr-356478/”]