अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सोनाली वेगवेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. याच काळात तिने वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट देखील केलं आहे. या फोटोशूटमध्ये सोनालीनं पोलका डॉटची (Sonalee Kulkarni In Polka Dot Dress) प्रिंट असलेला ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमधले फोटो तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सोनालीच्या गरोदरपणाबद्दल (Sonalee Kulkarni Pregnancy News) नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा, नताशा स्टॅन्कोविच, करीना कपूर खान यांसारख्या अभिनेत्रींनी गरोदरपणात पोलका डॉट ड्रेस परिधान केला होता. अनुष्काने असाच पोलका डॉटचा ड्रेस परिधान करत आपण गरोदर असल्याचं सांगितलं होतं. सोनालीने देखील तसाच काळ्या रंगाचा पोलका डॉट ड्रेस परिधान केला. त्यामुळे अनेकांनी तिला तू गरोदर आहेस का ? हा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. असा प्रश्न विचारणाऱ्यांना सोनालीनं सडेतोड उत्तर दिलं आहे.

सोनालीने काळ्या रंगाच्या पोलका डॉट ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले. त्यानंतर तिचे हे फोटो पाहून तू गरोदर आहेस का?, हा ड्रेस तू परिधान केला म्हणजे नक्कीच आनंदाची बातमी आहे, कुणीतरी येणार येणार गं अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. त्यानंतर सोनालीने कमेंट करत म्हटलं की, “जे लोक मला गरोदरपणाबाबत विचारत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की मी गरोदर नाही. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाच्या माध्यमातून मी नुकतंच माझं स्वप्न पूर्ण केलं आहे. चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पाहा.”
[read_also content=”विनोदी शोमध्ये दिसणार सेलिब्रिटींची धमाल, ‘केस तो बनता है’ चा ट्रेलर रिलीज https://www.navarashtra.com/entertainment/case-toh-banta-hai-trailer-launch-nrsr-305769/”]
सोनालीच्या या कमेंटनंतर ती गरोदर असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सध्यातरी सोनाली आणि कुणाल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भेटून एकत्र वेळ घालवत आहेत.






