• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Cinema »
  • Valentines Day Special Article On Marathi Movie Premachi Goshta

Valentines Day Special : पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी ‘प्रेमाची गोष्ट’

Valentines Day Special : प्रेम सगळेच करतात पण सहजपणे निभावणं जमतं त्याला प्रेमाचं जपता येतं. अशाच एका गोड कपलच्या प्रेमात पाडणारी प्रेमाची गोष्ट.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 14, 2026 | 08:16 AM
Valentines Day Special : पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी ‘प्रेमाची गोष्ट’
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाटक आणि सिनेमा तसा जिव्हाळ्याचा विषय हा तितका वेळ काढता येत नाही तो भाग वेगळा. तसे हलके फुलके किंवा कॉमेडी जॉनर आवडीचे आहेत पण कधीही आणि कितीही वेळा पाहावं वाटणाऱ्या सिनेमांमध्ये टॉपची दोन नावं म्हणजे मुंबई पुणे मुंबई आणि प्रेमाची गोष्ट. योगायोग म्हणजे दोन्ही सिनेमाचे दिग्दर्शक एकच सतीश राजवाडे.

काही पुस्तकं आणि सिनेमे असे काही असतात ना की, प्रत्येक वेळेला वाचावं पाहावं ते नवं काहीतरी देतात. ‘प्रेमाची गोष्ट’ त्यातलाच एक. एक सरळ साधी सोपी गोष्ट आणि साधे सोपे राम आणि सोनल. जनरली ना हिरो म्हटला की सॉलिड डॅशिंग, बॉडीबिल्डर, साधारण या पठडीतला दाखवला जातो. पण मनाने साधी, नाती जपणारी, प्रेम करणारी साधी असणारी अगदी राम आहे तसा अशीही काही मुलं असूच शकतात की एखाद्या सिमेमाचा आणि एखाद्या मुलीच्या आयुष्यातला हिरो. जुळून येती रेशीमगाठीमधला आदित्य, मुंबई पुणे मुंबईमधला गौतम आणि प्रेमाची गोष्टमधला राम, असंभव मालिकेतील विक्रांत यांच्या वागण्याशी मिळती जुळती मुलं असूच शकतात हिरो. आणि प्रेमाची गोष्टमधली सोनल सारखी साधी रसळ आणि परखड विचारांची मुलगी कोणालाही वाटेल आपलीशी. मुंबई पुणे मुंबई असो किंवा प्रेमाची गोष्ट जिथे प्रेम येतं ती गोष्ट राजवाडे खूप सुंदर सांगतात सिनेमातून.

आपण कोणासाठी तरी थांबणं जसं प्रेम आहे तसंच आपल्यावर प्रेम करणारी माणसं पण ओळखता यायला हवीत. रागिणीसाठी थांबलेला राम आधी जितका जेन्यून वाटतो तितकाच सोनल आयुष्यात आल्यावर तिचं जीव लावणं, तिची धडपड तिच्याबद्दल जे वाटतंय स्वीकारणारा राम त्यातही प्रेमच आहे.

खूपदा वाटतं या सगळ्या कथा फक्त सिनेमात होतात. पण परत राम म्हणतो ते आठवतं सिनेमाच्या गोष्टी आकाशातून येत नाही, त्या आपल्याच अवती भवती असतात फक्त शोधाव्या लागतात. माणसं असतात पॅशनेट नाती जपण्यात, प्रेमात म्हणून तर ते लिहिण्यातून सिनेमातून दिसतं. प्रेम चुकीचं नसतं ज्याच्यावर आपण प्रेम करतो काही वेळेस व्यक्ती चुकीची असू शकते पण प्रेम ही भावना कधीच चूक नसते. पण तेच एक निवड चुकली म्हणून आयुष्य थांबत नाही थांबून राहत नाही आणि ठेऊ देखील नये.

स्वप्नांच्य़ा मागे पळणाऱ्या रागिणीला रामचं तीळ तीळ तुटणं कळत नाही आणि स्वत:चाच हेका मिरवणाऱ्या समितला सोनलचं मन कधी जपता आलं नाही. पण प्रेम योग्य त्या वळणावर तुम्हाला भेटतच. आयुष्यात दोन प्रकारची माणसं असतात एक म्हणजे रागिणी आणि समितसारखी जी दाखवून देतात की सगळीच माणसं आपल्यासाठी नसतात काही जणं एका ठराविक वेळेनंतर आपला हात सोडून निघून जातात. तसंच दुसऱ्या प्रकारची माणसं देखील योग्य वळणार आयुष्य़ात येतात देखील जे पटवून देतात परिस्थिती किती ही खराब असो सगळेच सोडून नाही जात. आपल्यावर जीव लावणारी, आपली माणसं भांडतात, रुसतात रागावतात पण सोबत राहतात श्वासांची माळ तुटत नाही तोवर. सिनेमाची स्टोरी अगदी सामान्य माणसाला आपलीशी वाटावी आपल्या प्रेमाची गोष्ट वाटावी इतकी सरळ साधी आहे. ‘

हे’ आहे जगातील सर्वात महाग गुलाबाचं फूल, किंमत आहे 130 कोटी!

एक निर्णय चुकल्याने आयुष्यात हरलेल्या सोनलला राम भेटतो आणि तिच्यातली ती पुन्हा तिला नव्याने सापडते. मन आणि बुद्धीच्या भांडणात कायमच बुद्धीचं ऐकणाऱ्या रामने आजवर मन मारुन किती आयुष्य जगलं स्वत:च्या स्वप्नांना सोडलं. पण जग तू, तुला जे हवं जी तुझी ओळख आहे तू जप, तुझं लिहिणं तुझी ओळख आहे हे रामपटवून देणारी सोनल. सगळं किती खरं आणि प्रामाणिक वाटतं. प्रेम प्रेम म्हणजे नक्की तरी काय महागड्य़ा डेट्स किंवा गिफ्ट नाही. ज्याच्यावर आपण जीवापलिकडे प्रेम करतो त्याला त्याची ओळख मिळवून देणं. जिथे नातं टिकवण्याची धडपड दोन्ही बाजूने असतं ते प्रेम. अगदी सोनल आणि रामच्या नात्यासारखं. प्रेम कधीअस्तित्व मिटवत नाही तुम्हाला जगायचं शिकवतं. आपल्याबरोबर समोरच्या पार्टनरचं अस्तित्व जपायला शिकवतं. नुकतंच या सिनेमाला 13 वर्ष पूर्ण झाली. पण राम आणि सोनलची ही लव्हस्टोरी आजही तितकिच एव्हरग्रीन आहे. सिनेमाच्या स्टोरी प्रमाणेच काळजाचा ठाव घेणारं गाणं म्हणजे ओल्या सांजवेळी. खास करुन सांगाय़चं तर,
वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊदे
डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊदे काय कमाल लिहिलंय अश्विनी शेंडेनी. अतुल कुलकर्णी यांच्या विषयी नटरंग पाहिल्यापासून आदर होता पण प्रेमाची गोष्टमधल्य़ा राम व्यक्तिरेखेतले अतुल कुलकर्णी जास्त आवडतात. ना कुठला सो कॉल्ड मेलो ड्रामा ना कुठल्या हाणामारी तरीही कितीही वेळा पाहिला तरी नव्याने प्रेमात पाडतो हा सिनेमा. कारण प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे.

‘या’ दिवशी जोडपे एकमेकांना लाल गुलाब का देतात, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व आणि इतिहास…

Web Title: Valentines day special article on marathi movie premachi goshta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • Entertainment News
  • navrashtra news
  • Valentine Day

संबंधित बातम्या

Valentine Day 2026: व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी चंद्राचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी ठरणार खास, नात्यामधील गैरसमज होतील दूर
1

Valentine Day 2026: व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी चंद्राचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी ठरणार खास, नात्यामधील गैरसमज होतील दूर

आयुष्यभर नात्यामधील प्रेम आणि आदर जपण्यासाठी जोडीदाराला पाठवा Valentine’s Day च्या प्रेमळ शुभेच्छा
2

आयुष्यभर नात्यामधील प्रेम आणि आदर जपण्यासाठी जोडीदाराला पाठवा Valentine’s Day च्या प्रेमळ शुभेच्छा

रोमँटिक गेटवे प्लॅन करताय? 2026 च्या ‘व्हॅलेंटाईन’ला महाराष्ट्रातील ही ठिकाणे ठरतील परफेक्ट!
3

रोमँटिक गेटवे प्लॅन करताय? 2026 च्या ‘व्हॅलेंटाईन’ला महाराष्ट्रातील ही ठिकाणे ठरतील परफेक्ट!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!
4

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Valentines Day Special : पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी ‘प्रेमाची गोष्ट’

Valentines Day Special : पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी ‘प्रेमाची गोष्ट’

Feb 14, 2026 | 08:16 AM
Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या – चांदीचे दर नरमले, काय आहेत आजच्या किंमती? जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या – चांदीचे दर नरमले, काय आहेत आजच्या किंमती? जाणून घ्या

Feb 14, 2026 | 08:08 AM
विठ्ठल नामाचा गजर आता जर्मनीच्या देशभूमीवर; देहूतून संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे भव्य हस्तांतरण

विठ्ठल नामाचा गजर आता जर्मनीच्या देशभूमीवर; देहूतून संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे भव्य हस्तांतरण

Feb 14, 2026 | 07:55 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर; उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर; उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची बैठक

Feb 14, 2026 | 07:17 AM
MG Majestor vs MG Gloster: एकाच कंपनीच्या दोन पॉवरफुल एसयूव्ही, जाणून घ्या दोन्ही मॉडेल्समधील नेमका फरक

MG Majestor vs MG Gloster: एकाच कंपनीच्या दोन पॉवरफुल एसयूव्ही, जाणून घ्या दोन्ही मॉडेल्समधील नेमका फरक

Feb 14, 2026 | 06:15 AM
पोलिस भरतीत उच्चशिक्षित तरुणांचा वाढता ओघ! पदवी, पदव्युत्तर, अभियंतेही शिपाईपदासाठी उतरले मैदानात

पोलिस भरतीत उच्चशिक्षित तरुणांचा वाढता ओघ! पदवी, पदव्युत्तर, अभियंतेही शिपाईपदासाठी उतरले मैदानात

Feb 14, 2026 | 04:15 AM
Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Feb 14, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.