फोटो सौजन्य - Social Media
कलर्सवर प्रदर्शित होणारा कुकिंग शॉ लाफ्टर शेफ पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. रिम शेखनंतर आणखीन एका कलाकाराबरोबर दुर्घटना घडली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन आणि ऍक्टर सुदेश लहरी यांच्या बरोबर ही घटना घडली आहे. सुंत्रांच्या अनुसार बातमीसमोर आली आहे कि, शूटिंगच्या दरम्यान सुदेश लहरी यांना चाकू लागला आहे. त्यामुळे ते जखमी झाले आहेत. या घटनेने त्यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात; मनसेने दिला गंभीर इशारा
लाफ्टर शेफच्या चालू शूटिंग दरम्यान ही घटना घडली आहे. या शॉच्या प्रेक्षकांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. स्वयंपाक करत असताना निया शर्माच्या हातामध्ये असलेली सूरी चुकून सुदेश लहरी यांना लागते. दरम्यान त्यांच्या बोटाला जखम होते. या जखमेमुळे हातातून रक्तस्त्राव होऊ लागतो. महत्वाची गोष्ट म्हणजे सुदेश लहरी यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. विशेष बाब अशी कि हाताला जखम होऊनही सुदेश लहरी यांनी शूटिंग थांबू दिली नाही. त्यांनी त्यांच्या त्या दिवशीची शूटिंग यशस्वीरीत्या पूर्णत्वास आणली, ज्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत. अशा परिस्थितीमध्येही त्यांनी त्यांच्या कामाला प्राथमिकता दिली म्हणून सुदेश लहरी कौतुकास पात्र ठरले आहेत.
याआधीही लाफ्टर शेफ या कार्यक्रमामध्ये दुर्घटना घडल्या आहेत. प्रसिद्ध गायक आणि महाराष्ट्राचा मराठमोळा आवाज असलेल्या राहुल वैद्यसोबतही एक घटना घडली होती. कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये राहुल वैद्य आगीच्या विलोख्यामध्ये दिसून आला होता. चांगली गोष्ट अशी कि सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही. राहुल वैद्य यांना थोड्या त्रासाला सामोरे जावे लागले. सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर रिम शेखसोबतही दुर्घटना घडली होती. चालू कार्यक्रमामध्ये जेवण तयार असताना रिमच्या चेहऱ्यावर गरम तेलाचे शिंतोडे उडतात. यामुळे तिच्या चेहऱ्यावर डाग तयार झाले आहेत. तिने यासंदर्भात आपल्या चेहऱ्यावर डाग दाखवण्यासाठी तिच्या इंस्टग्राम हॅन्डलवर पोस्ट केली होती. दरम्यान, ही घटना ज्या एपिसोडमध्ये घडली तो एपिसोड अद्याप प्रदर्शित केला गेला नाही आहे.
हे देखील वाचा: National Daughter’s Day : ऑन-स्क्रीन मुलगी आणि आई-वडिलांची मने जिंकणारी सुंदर जोडी
लाफ्टर शॉ हा कार्यक्रम दर गुरुवारी आणि शुक्रवारी कलर्स तसेच जियो सिनेमावर लागतो. या कार्यक्रमाने स्वयंपाक प्लस विनोद या कॉम्बिनेशनमुळे मोठा प्रेक्षकवर्ग आकर्षित केला आहे. या कार्यक्रमामध्ये अंकिता लोखंडे, विक्की जैन, निया शर्मा, अली गोनी, राहुल वैद्या, जन्नत जुबैर, करण कुंद्रा, अर्जुन बिजलानी, कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, सुदेश लहरी आणि रिम शेख सारखे प्रसिद्ध व्यक्तिमत्तव शेफ म्हणून आहेत.