मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laudering) जॅकलिन फर्नांडिज (Jacqueline fernandez) ची ईडीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून नव नवीन माहिती समोर येत आहे. सुकेश चंद्रशेखरनकडून तिनं महागडे गिफ्ट घेतल्याची माहिती समोर आली होती त्या अनुषगांने तपास सुरू असताना आता पुन्हा एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
[read_also content=”‘मै और मेरी नऊवारी’…अमरावतीच्या तरुणीनं गायिलेल्या मराठमोळ्या रॅपची सोशल मीडियावर एकच चर्चा https://www.navarashtra.com/movies/marathi-rap-sung-by-a-girl-from-amravati-is-the-only-discussion-on-social-media-nrps-329139.html”]
सुकेश चंद्रशेखरनकडून जॅकलिननं कपडे खरेदी करण्यासाठी तीन कोटी घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. लिपाक्षी ही या तीच्या स्टायलिस्ट ही माहिती दिल्ली पोलिसांना दिली. याबाबत दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेनं लिपाक्षीचा जबाब नोंदवून घेतला आहे. याशिवाय सुकेशनं जॅकलीच्या बहिण आणि आई वडीलांना देखील महागड्या वस्तु पाठवल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जॅकलीनच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची चिन्ह दिसत आहे.
[read_also content=”आज झूलन गोस्वामी खेळणार कारकिर्दीतील अखेरचा सामना https://www.navarashtra.com/sports/jhulan-goswami-will-play-the-last-match-of-his-career-today-329128.html”]
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिजचं नाव समोर आल्यनंतर जॅकलिनची सुकेश चंद्रशेखर सोबत मैेत्री असल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणी अनेकदा जॅकलिनची चौकशी करण्यात आली आहे. तर, जॅकलिन प्रमाणे सुकेशने काही अभिनेत्रींना सुद्घा महागडे गिफ्ट दिल्याची चर्चा रंगली होती. यामध्ये अभिनेत्री नोरा फतेहीचे देखील नाव आले होते. काही दिवसापुर्वी ईडीनं नोराचीही चौकशी केली होती.