मुंबई : हिंदीच्या टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 15’ ची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) ही विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. बराच काळ हिंदी मालिका सृष्टीत काम करत असलेली तेजस्वी आता मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमठविण्यासाठी सज्ज झाली आहे. तेजस्वी प्रकाश लवकरच अभिनय बेर्डेसोबत ‘मन कस्तुरी रे’ (Man Kasturi Re) या मराठी चित्रपटात झळकणार असून या चित्रपटातील तिचा पहिला लूक आता समोर आला आहे.
आज १३ सप्टेंबर रोजी तेजस्वीने तिच्या सोशल मीडियावर तिच्या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक चाहत्यांच्या समोर आणला आहे. तेजस्वी प्रकाशच्या या चित्रपटात एका रॉकस्टारच्या भूमिकेत पाहायला मिळेल असं दिसतंय. समोर आलेल्या या फर्स्ट लुक मध्ये तेजस्वी खूपच लाघवी दिसत आहे. या चित्रपटात ती ‘श्रुती’ (Shruti) या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही श्रुती एका बाजूला शांत स्वभावाची मुलगी आहे तर त्याचबरोबर ती एक रॉकस्टार असल्याचं दिसतंय. हा टिझर पाहून आता चाहत्यांच्या मनात या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहेत. ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
टीझरला काही कालावधीतच चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तेजस्वीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा टिझर रिलीज केला आहे. या पोस्टला तिने मस्त कॅप्शन देत लिहिलंय की, ”’ती…पहाटे पडलेलं गोड स्वप्न…ती…सांजवेळी बहरलेल्या मोगऱ्याचा सुगंध…तिच्या सोबतीचे क्षण हवेहवेसे…तिला पाहता मन कस्तुरी रे!…मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय एक गोड हसरा चेहरा … ‘श्रुती’ च्या भूमिकेत.. तेजस्वी प्रकाश”
तेजस्वी प्रकाश मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डेचा मुलगा अभिनय बेर्डे (Abhinay Berde) सोबत झळकणार आहे. अभिनय हा एक प्रसिद्ध स्टारकीड असूनसुद्धा त्याने आपली स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. मराठी सिनेसृष्टीत आता हि नवीकोरी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.