सौजन्य: सोशल मीडिया
‘कांगुवा’ हा या वर्षातील सर्वात मोठा आणि महागडा चित्रपट आहे. अंदाजे 350 कोटींपेक्षा जास्त बजेट असलेला हा चित्रपट आहे. ‘पुष्पा’, ‘सिंघम’ आणि इतर अनेक मोठ्या चित्रपटांपेक्षा मोठा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण वेगवेगळ्या खंडातील 7 देशांमध्ये करण्यात आले आहे. प्रागैतिहासिक कालखंडाचे चित्रण करणारा हा एक अनोखा चित्रपट आहे. निर्मात्यांनी ॲक्शन आणि सिनेमॅटोग्राफी सारख्या तांत्रिक विभागांसाठी हॉलीवूड तज्ञांची मदत घेतली आहे. हा चित्रपट एकूण 10 हजारांहून अधिक लोकांना घेऊन चित्रित करण्यात आला होता आणि यात सर्वात मोठा युद्धाचा सीन देखील आहे.इतकेच नाही तर स्टुडिओ ग्रीनने टॉप डिस्ट्रिब्युशन हाऊसेसशी हातमिळवणी केली आहे. जेणेकरून हा चित्रपट जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होऊ शकेल. हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. कांगुवाचे वितरण करणारे निर्माते पुष्पा 2 चेही निर्माते आहेत.
‘कंगुवा’ हा वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट
स्टुडिओ ग्रीन निर्मित, ‘कंगुवा’ हा वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. तामिळ चित्रपटातली आघाडीचा नायक सूर्या हा या चित्रपटात मुख्य भुमीकेत दिसणार आहे. टीझरमध्ये त्याच्या रोमांचक आणि आगळ्यावेगळ्या जगाची झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. आता निर्मात्यांनी 10 ऑक्टोबर 2024 रोजी चित्रपट प्रदर्शित करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता सर्वचजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘कांगुवा’च्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक मनोरंजक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याच्या रोमांचक जगाची झलक दाखवण्यात आली आहे. त्यांनी हेही सांगितले आहे की, निर्मात्यांनी निजाम प्रदेशासाठी चित्रपटाचे वितरण कोणाला विकले आहे?
‘कांगुवा’ च्या निर्मात्यांनी हक्क कोणाला विकले?
निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ सर्वात प्रतिष्ठित मैथ्री मुव्हीज निजामातील कांगुवाच्या भव्य आगमनाचा साक्षीदार आहेत. तुम्ही आमचे वितरण भागीदार म्हणून आम्हाला आनंद झाला आहे.’ म्हणजेच चित्रपटाचे हक्क मैथ्री मुव्हीज यांच्याकडे आहेत. आणि हा या वर्षातील सर्वात मोठा आणि महागडा चित्रपट आहे.