बॉलिवूडचा ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ करण जोहरसोबत एका बिग बजेटच्या चित्रपटासाठी तयार झाला आहे. वृत्तानुसार टायगर श्रॉफ धर्मा प्रॉडक्शन निर्मित एका चित्रपटात काम करणार आहे. या प्रोजेक्टमध्ये तो याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे असंदेखील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
टायगरने याआधी अनेक ॲक्शन चित्रपटांमध्ये काम केले असून करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द ईअर २ मध्येही टायगर झळकला होता. लहान मुलांमध्ये टायगरची क्रेझ आहे. त्यामुळे टायगरला पुन्हा एकदा ॲक्शन चित्रपटांमध्ये पाहणं ही त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे. मात्र या नव्या चित्रपटामध्ये त्याची भूमिका काहीशी वेगळी असू शकते असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वेगळ्या भूमिकेत दिसणार टायगर
या सोबतच अनेक स्क्रिप्ट्सचा अभ्यास केल्यानंतर टायगर आणि करण या दोघांनी ही स्क्रिप्ट निवडली आहे. 2025 मध्ये ही बिग बजेट फिल्म मोठ्या पडद्यावर येणार आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की हा चित्रपट एक मनोरंजन करणारा आहे जो भव्य दिव्य असणार असून गेल्या 10 वर्षात टायगरने केलेल्या भूमिकेपेक्षा हे पात्र वेगळे आहे. हा प्रोजेक्ट काय असेल हे जाणून घेण्यासाठी टायगेरियन्स उत्सुक आहेत.
विश्लेषकाचे ट्विट
Tiger Shroff and Dharma Productions collaborate on a big-budget feature film to be produced by Karan Johar.
The actor returns to the big screen in 2025 with a role that he hasn’t done ever before!@iTIGERSHROFF @DharmaMovies https://t.co/zQLlQdMb2A
— Joginder Tuteja (@Tutejajoginder) May 20, 2024
वाढली चाहत्यांमध्ये उत्सुकता
व्यापार विश्लेषक जोगिंदर टुटेजा यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ही मोठी बातमी शेअर करून लोकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. हा आगामी चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार असला तरी टायगरचे काही खास प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये आहेत. तो शेवटचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये दिसला होता आता तो ‘सिंघम अगेन’च्या रिलीजच्या तयारीत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ॲक्शनर ‘बागी 4’ साठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.