Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळणार महावटपौर्णिमा, वडाच्या रक्षणासाठी नायिका उठवणार आवाज

मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टार प्रवाहच्या १५ नायिका एकत्र येऊन वडाच्या रक्षणासाठी आवाज उठवणार आहेत. व्रताचे धागे तोडू पहाणाऱ्या वाईट प्रवृत्ती विरोधातला हा लढा असेल.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 03, 2025 | 05:13 PM
टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळणार महावटपौर्णिमा, वडाच्या रक्षणासाठी नायिका उठवणार आवाज

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळणार महावटपौर्णिमा, वडाच्या रक्षणासाठी नायिका उठवणार आवाज

Follow Us
Close
Follow Us:

वरुण राजाचं आगमन झालं की चाहूल लागते ती वटपौर्णिमा सणाची. पती-पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी वटवृक्षाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने या वृक्षाचं संवर्धन केलं जावं हा महत्त्वाचा उद्देश देखिल या सणामागे आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टार प्रवाहच्या १५ नायिका एकत्र येऊन वडाच्या रक्षणासाठी आवाज उठवणार आहेत. व्रताचे धागे तोडू पहाणाऱ्या वाईट प्रवृत्ती विरोधातला हा लढा असेल. ज्या वटवृक्षाने दर वटपौर्णिमेला सौभाग्यवतींना आशीर्वाद दिला त्याच्या मुळावर जेव्हा कुणी घाव घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही लढाई कुणा एकाची नसते. तर आपल्यातल्याच असंख्य शुभा, नंदिनी, सायली, कला आणि अबोली सारख्या रणरागिणी एकत्र येतात आणि या प्रवृत्तीचा नायनाट करतात. आजच्या युगाची सती सावित्री कशी असावी याचा आदर्श घालून देतात.

‘प्रेमाची गोष्ट’ नंतर तेजश्री प्रधान पुन्हा येतेय, वाढदिवशी खास पोस्टकरत चाहत्यांना दिली ‘हिंट’; काय असणार ‘सरप्राईज’

मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे स्टार प्रवाह वाहिनीचं ब्रीदवाक्यच आहे. परंपरेसोबतच सामाजिक भान जपण्याचा स्टार प्रवाहने नेहमीच प्रयत्न केला आहे. महावटपौर्णिमेचा हा विशेष भाग याच प्रयत्नातलं पुढचं पाऊल म्हणता येईल. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. पूर्वापार चालत आलेले सण आणि परंपरा आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी भाग पाडतात. वटपौर्णिमा हा सण हे त्याचच एक उत्तम उदाहरण. त्यामुळे वटवृक्षाचं रक्षण करुन स्टार प्रवाहच्या नायिका यंदाची वटपौर्णिमा खऱ्या अर्थाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करणार आहेत.

परेश रावल यांनी व्यक्त केली खंत, ‘हेरा फेरी ३’मधून साईडलाईन केल्यामुळे घेतली एक्झिट?; म्हणाले, “मी तर हिरो होतो…”

आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेतील शुभा म्हणजेच निवेदिता सराफ म्हणाल्या, ‘मालिकांमधील सगळ्या नायिकांना एकत्र आणून त्यांच्या पात्राचा विचार करुन गोष्ट लिहिली गेलीय याचं कौतुक वाटतं मला. शूट नाही तर एखादा छान समारंभ सुरु आहे असंच वाटतंय. पूर्वापार चालत आलेल्या सणांमागे खूप चांगला विचार आहे तोच पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. वृक्षसंवर्धन हा विषय सध्या अत्यंत महत्त्वाचा आहे. निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलं आहे या निसर्गाला जपणं हे आपलं कर्तव्य आहे. महावटपौर्णिमेच्या या विशेष भागाच्या निमित्ताने १५ नायिका एकत्र येऊन वटवृक्षाच्या रक्षणासाठी कसा लढा देणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.’

 

‘कहानी’ फेम परमब्र चट्टोपाध्याय झाला बाबा, पत्नीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत दिली ‘गुड न्यूज’

ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, ‘हा फक्त महासंगम आहे असं मी म्हणणार नाही. महावटपौर्णिमेच्या निमित्ताने खूप चांगला उपक्रम स्टार प्रवाह वाहिनी राबवते आहे. निसर्गाच्या सानिध्यात आपण प्रत्येकानेच जायला हवं. वटपौर्णिमा सण आपल्याला हेच शिकवतो. या विशेष भागातूनही आपल्या रुढी, परंपरा आणि निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे पहाता येईल. झाडांचं संवर्धन करण्यासाठी कश्या १५ नायिका एकत्र येऊन लढा देतात याची छान गोष्ट गुंफण्यात आली आहे. या निमित्ताने वडाच्या झाडाजवळ ४ दिवस शूट करता आलं. आम्ही सगळ्या नायिका एकत्र होतो. शूट करताना खूपच मजा आली अशी भावना जुई गडकरीने व्यक्त केली.’

तेव्हा पाहायला विसरु नका महानायिकांची महावटपौर्णिमा रविवार ८ जूनला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title: Vat purnima 2025 special episode on star pravah starring all 15 actresses including jui gadkari reshma shinde mrunal dusanis dnyanada ramtirthkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi serial update
  • star pravah serial
  • Television Actress
  • tv serial
  • vat pornima

संबंधित बातम्या

”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!
1

”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!

”यापेक्षा मोठं भाग्य नाही..” संभवामी युगे युगे’वर बोलताना अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केल्या भावना व्यक्त, म्हणाली…
2

”यापेक्षा मोठं भाग्य नाही..” संभवामी युगे युगे’वर बोलताना अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केल्या भावना व्यक्त, म्हणाली…

‘माझा १२ वर्षांचा मुलगा…’ ब्लू साडी गर्लचे एआय फोटो व्हायरल, अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
3

‘माझा १२ वर्षांचा मुलगा…’ ब्लू साडी गर्लचे एआय फोटो व्हायरल, अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष
4

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.