(फोटो सौजन्य - x अकाउंट)
‘हेरा फेरी ३’मधून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता परेश रावल यांनी एक्झिट घेतली आहे. एक्झिट घेतल्यानंतर अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊसने अभिनेत्याकडून फीचे घेतलेले पैसे आणि त्यावरील व्याज घेतले आहे. अभिनेत्याने चित्रपटातून एक्झिट घेतली असली तरीही चाहत्यांच्या मनात अभिनेत्याच्या प्रती बाबूराव गणपतराव आपटे उर्फ बाबू भैय्या या पात्राची प्रतिमा कायम आहे. अभिनेत्याने नुकतंच सोशल मीडियावर चाहत्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
प्रसिद्ध पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर अभिनेत्रीची घरात घुसून हत्या, नातेवाईक सांगून केला प्रवेश!
‘रेडिफ’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संवाद साधताना परेश रावलने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. २००१ मध्ये अभिनेता परेश रावल यांना ‘हेरा फेरी’साठी ‘सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार’ आणि ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता (विनोदी भूमिका)’ अशा दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला होता. आता, या संदर्भात, एका चाहत्याने परेश रावल यांना प्रश्न विचारला आहे. तो म्हणाला की, तुम्हाला २००१ मध्ये मिळालेल्या दोन पुरस्कार मिळाल्याने आनंदी आहेत का? तर ते म्हणाले, “मी चित्रपटाचा नायक होतो. पुरस्कारांमध्ये काहीही बोलले गेले तरी चालेल.” अशा प्रकारे अभिनेत्याने पुरस्कार सोहळ्यात त्यांना साईडलाईन केले असल्याचे सूचित केले.
एका चाहत्याने परेश रावल यांना विचारले की, “मला माहित आहे की तुम्हाला ‘सर’ (Sir) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला तेव्हा तुम्ही रागावला होता. आता तुम्ही ‘सर्वोत्तम विनोदी कलाकार’ पुरस्कार मिळाल्यानंतर आनंदी आहात का?’ यावर अभिनेत्याने उत्तर दिले, ‘सर’ चित्रपटात मी खलनायक नव्हतो. मी एक कॅरेक्टर कलाकार आहे पण ‘हेरा फेरी’ चित्रपटात मी नायक होतो… काय मूर्खपणा आहे.” परेश रावल चित्रपटाच्या हेरा फेरीच्या दोन्ही भागात दिसले होते. पण त्यांनी स्वतः तिसऱ्या भागातून माघार घेतली आहे. त्यांनी सायनिंगची रक्कम परत केली आहे आणि सांगितले की, ते ‘हेरा फेरी ३’मध्ये काम करणार नाही. यावर बराच गोंधळ उडाला आहे. पंकज त्रिपाठी त्यांची जागा घेऊ शकतात अशी बातमी आहे. मात्र, अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार ‘हेरा फेरी ३’ मध्ये पाहायला मिळतील.