Tejashri Pradhan Shares Birthday Special Post Gratitude Towards Fans And Hint About Comeback
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानला आज विशेष ओळखीची गरज नाहीये. आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या माध्यमातून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेतून तेजश्रीने ब्रेक घेतल्यापासून तिचे चाहते तिच्या नव्या भूमिकेची आणि तिच्या नव्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर, तेजश्रीने आपल्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या एका पोस्टमधून तिच्या चाहत्यांना एक खास ‘गुपित’ सांगितलं आहे, ज्यामुळे तिच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने कमल हसन यांना फटकारले, कन्नड वादात आणखी वाढ!
तेजश्रीने तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टची हिंट दिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तेजश्रीने लिहिलेय की, “प्रिय माझी माणसं, पुन्हा एकदा नव्याने, “माणसांची श्रीमंती आपल्या आयुष्यात फार गरजेची असते आणि सरत्या प्रत्येक वर्षासोबत मी अधिकाधिक श्रीमंत होतेय” याची ग्वाही तुमच्या शुभेच्छांमधून करून दिलीत यासाठी मनःपूर्वक आभार… तुमच्या प्रेमाने, मोठ्यांच्या आशिर्वादांनी माझा कालचा वाढदिवस खूपचं छान, मनासारखा पार पडला त्या साठी सुद्धा खूप Thank You, अगदी मनापासून… बाकी काय! सरलं ते सरलं… राहिलं ते राहिलं… आयुष्यात चढउतार येत राहतात. अनेक गोष्टी शिकायला मिळतात… आनंदी आयुष्य, achievement, आयुष्यातील शांतता या गोष्टीही महत्त्वाच्या असतात आणि बाकी हळुहळू, शिकत-शिकत Betterment कडे वाटचाल चालूच राहिल. तुम्ही सगळे असेच कायम माझ्याबरोबर राहा, कारण “तू हैं तो गम ना आते हैं, तू हैं तो मुस्कुराते हैं” लवकरच तुमच्या भेटीला येतेय… काहीतरी आणखी छान घेऊन” अशी पोस्ट तेजश्रीने तिच्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे.
ही आनंदाची बातमी तेजश्रीने तिच्या सर्व चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आता तेजश्री नेमकी कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार ? याचा उलगडा अद्याप तिने केलेला नाही. आता अभिनेत्री येत्या काळात मालिका, चित्रपट, नाटक की अन्य कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र, तिचे चाहते ही पोस्ट वाचून प्रचंड आनंदी झाले आहेत आणि अभिनेत्रीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाटत पाहत आहेत.
Maalik चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज, राजकुमार रावचा रक्ताने माखलेला लुक व्हायरल
तेजश्री प्रधानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अभिनेत्री तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारत होती. मात्र काही महिन्यांपूर्वीच तिने ती अचानक मालिका सोडली. तिला पुन्हा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याशिवाय ती ‘होणार सून मी ह्या घरची’,’अग्गंबाई सासूबाई’ या मालिकांसह काही चित्रपटांमध्येही देखील झळकली आहे. तेजश्रीचा शेवटचा चित्रपट ‘हॅशटॅग तदैव लग्नम’ हा होता.